Pune : जेसीबीने घर पाडून महिलेचा विनयभंग; काळेवाडीमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:28 IST2022-11-01T15:27:39+5:302022-11-01T15:28:37+5:30

महिलेचे राहते घर जेसीबीच्या साह्याने पाडले...

JCB demolished house and molested woman; Shocking incident in Kalewadi | Pune : जेसीबीने घर पाडून महिलेचा विनयभंग; काळेवाडीमधील धक्कादायक घटना

Pune : जेसीबीने घर पाडून महिलेचा विनयभंग; काळेवाडीमधील धक्कादायक घटना

पिंपरी : घरात घुसून शिवीगाळ करत महिलेला घराबाहेर काढून मनात लज्ज उत्पन्न होईल, असे कृत करत विनयभंग केला. तसेच महिलेचे राहते घर जेसीबीच्या साह्याने पाडले. ही घटना सोमवारी (दि.३१) नढेनगर, काळेवाडी येथे दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महेश नढे, जेसीबीवरील महेश नढे यांचे दोन साथीदार तसेच सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरात टीव्ही पाहत असताना आरोपी महेश नढे आणि त्याच्या सोबत पाच ते सहा महिला फिर्यादींच्या घरात घुसले. आरोपी महेश याने फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलीला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला घराबाहेर काढत गैरवर्तन करून विनयभंग केला. आरोपींनी फिर्यादी राहत असलेल्या पत्राचे शेड जेसीबीच्या साह्याने पाडून घरातील सामानाची तोडफोड केली.

Web Title: JCB demolished house and molested woman; Shocking incident in Kalewadi