शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:39 IST

धनंजय देशमुखांनी शासनाकडे  मागितली न्यायाची भिक

बारामती  - स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसह ,घटनेच्या निषेधार्थ बारामतीत सर्वर्धमिय मोर्चा काढण्यात  आला.यावेळी देशमुख यांची मुलगी वैभवी हिने रडतरडत केेलेल्या भाषणाने बारामतीकरांच्या काळजाला हात घातला.यावेळी तिचे भाषण एेकताना बारामतीकरांना गहिवर अनावर झाल्याचे चित्र होते.तर देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी वेळीच या प्रकरणाची पोलीसांनी घेतली नसल्याने हि घटना घडल्याचा  आरोप करीत न्यायाची भिक देण्याची मागणी केली.यावेळी धनंजय देशमुख म्हणाले,बीड जिल्ह्यातील कायदा व्यवस`थेबद्दल इथे  काहीच माहिती नाही.एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला कशा पध्दतीने संपवले गेले.मी मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंंत्र्यांना न्यायाची भिक मागत आहे.त्यांनी तो द्यावा.२८ मे २०२४ रोजी या पहिल्या घटनेची सुरवात झाली.अवादा कंपनीच्या उच्चपदस`थ अधिकारी यांचे याच लोकांनी अपहरण करण्यात आले.याबाबत कंपनीने त्यानंतर २९ तारखेला एफआयआर दाखल झाला.परंतु दोघांनी अपहरण केले होते.मात्र,त्यात एकाच व्यक्तीचे नाव आहे.त्याचा कुठेही तपास झाला नाही. आरोपींना कळुन चुकले आपले  काहीही  होत नाही.त्याच अनुषंगाने सुत्रधार वाल्मिक कराड याने खाली  सुचना दिल्या.त्याप्रमाणे या सगळ्या ,२९ नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली.मात्र कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.त्याच वेळी गुन्हे दाखल झाले असते,तर या घटना घडल्याच नसत्या,असा उल्लेख देशमुख यांनी केला.एवढ्यावर हे लोक थांबले नाहित. ६  डिसेंबरला हे आठजण कंपनीत आले.परत एका दलीत बांधवाला अमानुषपणे मारण्यास सुरवात केली.तो किंचाळत ,मार खात होता.म्हणुन गावातील एका व्यक्तीने संतोष आण्णांना फोन केला.तो सोडवायला गेला.भांडण सोडविताना त्यांना मारले.गावातील लोकांना हातापायी झाली.त्या विरोधात अशोक सोनववणे हा दलीत बांधव पोलीस ठाण्यात बसून तक्रार देण्यासाठी भिक मागत होता.परंतु राजकीय पाठबळ असल्याने त्याची एफआयआर घेतली नाही.ती अॅट्राॅसिटी घेतली असती तर गुन्हा घडला नसता.जिथल्या तिथं या गोष्टी घडल्या असत्या तर हि घटना घडली नसती.अडीच महिन्यांनी पुन्हा हाच घटनाक्रम सुरु आहे. आतातरी लक्ष घाला,तरच आम्हाला बीड जिल्हाला न्याय मिळेल.आता देखील तिथ वातावरण भयावह आहे.गुन्हेगारी वाढली आहे.बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस`था राहिली नाही.एका गरीब कुटुंबातील निष्पाप व्यक्तीला कशा पध्दतीने संपवले.मी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची भिक मागतोय.त्यांनी गांभीर्याने घेत आम्हाला न्याय द्यावा.बीडमध्ये आरोपी सांगतील तसेच घडते.त्यांना राजकीय पाठबळ आहे.आज देखील तिथ भीतीयुक्त वातावरण आहे.गुन्हेगारीचे खुप मोठे जाळे आहे.अठरापगड जातीच्या सर्वर्धमियांनी आम्हाला सावरले.त्यामुळे आम्ही न्याय मागण्याची हिंमत आमच्यात आली.या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे आमच्याकडे आहेत.ते लवकरच मुख्यमंत्र्यांना,उपमुख्यमंत्र्यांना  देणार आहे.उपमुख्यमंत्री साहेबांनी होणार्या गोष्टीचा हस्तक्षेप काढुन टाकावा,तुमचे काहीही नुकसान होणार नाही,याची खात्री मी सर्वांच्या वतीने देतो,असे देशमुख म्हणाले.यावेळी वैभवी देशमुख हिने रडतरडत भाषण करताना,माझ्या वडीलांना न्याय देण्याची मागणी केली.माझ्या वडीलांची हत्या खंडणीतून झाली. हि खंडणी कोणासाठी जात होती,कोणासाठी ठेवली होती,असा सवाल तिने केला.माझ्या वडीलांनी नेमका काय गुन्हा केला होता,दलीत बांधवाला वाचविण्यासाठी गेलेल्या माझ्या वडीलांनी एवढी क्रुर शिक्षा कशासाठी,असे घडल्यास कोणीच दुसर्यासाठी पाऊल उचलणार नाही.सर्वांनीच हात दिल्याने न्यायाचा लढा पुढे आल्याचे तिने नमुद केेले. बीड जिल्ह्यातील घाण काढुन टाकायची आहे.यांना शिक्षा भेटली नाही,तर रस्त्याने  जाताना धक्का लागला तरी खुन होइल,अशी भीती व्यक्त केली. आमच घर माळवदाच घर आहे.एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या.मात्र, माझ्या वडीलांनी माझ्या आइला त्या  मुंग्यांवर पावडर टाकुन दिली नाही.चिकटपट्टी लावुन मुंग्या खाली येण्यापासून थांबविल्या,एवढया संवेदनशील मनाचे माझे वडील,होते,त्यांच्यासारखे कोणीच नव्हते,हे सांगताना वैभवीचा अश्रुंचा बांध फुटला. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे