शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा

By admin | Updated: June 9, 2014 05:11 IST

संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो.

मार्गासनी : संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो. या सोहळ्यास राज्यभरातून शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवप्रेमी वारंवार करीत आहेत. या अनोख्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेल्हा व भोर तालुक्यातील शिवाजी महाराजांचे हजारो मावळे जातात. ६ जून १६७४ रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या गुंजन मावळ परिसरातील गडकोट व येथील नद्यांचे पाणी शिवराज्याभिषेकासाठी आणण्यात आले होते. याची स्फुर्ती घेऊन ही परंपरा तालुक्यातील मावळा जवान संघटनेने सुरू ठेवली असून, राजगड परिसरातून संघटनेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर व पुरंदर या किल्ल्यांवरील व गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, भामा-भीमा, इंद्रायणी, मुठा या सप्त नद्यांचे जलकुंभ यात्रा किल्ले तोरणा, राजगड ते रायगडपर्यंत केली जाते. या जलकुंभ यात्रेत मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सणस व ज्येष्ठ इतिहास तज्ञ दत्ताजी नलावडे, हनुमंत दिघे, मनोज ओव्हाळ, राहुल भोसले, दत्ता मळेकर, दिगंबर धुमाळ तसेच शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश म्हेत्रे, विनायक कालेकर आदींसह लाखो शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.पाच जून रोजी राजगडावरुन निघालेल्या जलकुंभ यात्रेचे स्वागत भोर येथील शिवाजी चौकात करण्यात आले. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासमवेत मावळा संघटनेच्या मावळ्यांनी रायगड किल्ला पायी पन्नास मिनिटांत सर केला. (वार्ताहर)