जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:32 IST2025-10-27T13:32:14+5:302025-10-27T13:32:45+5:30
गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. त्याठिकाणी एचएनडी बोर्डिंगच नाव लागायला हवे

जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी
पुणे : बोर्डिंग संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आणि जैन धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही गोखले बिल्डर्सला विनंती केलेली आहे की, हा व्यवहार त्यांनी रद्द करावा गोखले बिल्डर्सनी आमच्या विनंतीला मान देऊन एच एन डी ट्रस्टीना मेल करून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली आहे. जरी गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. ते नाव कमी होऊन पुन्हा एचएनडी बोर्डिंगच नाव लागत नाही. आणि ही बोर्डिंग पुन्हा पूर्ववत होत नाही. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुन्हा सुरू होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
शेट्टी म्हणाले, आज दुपारी माझ्या अध्यक्षतेखाली जैन बोर्डिंग या ठिकाणी 86 हुन अधिक जैन संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन एकमताने ठराव करण्यात आला की, HND जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय जो ट्रस्टींनी घेतलेला आहे. तो बेकायदेशीर आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात ६० वर्षाहून अधिक असणारे बोर्डिंग विकणे हे बेकायदेशीर आहे. अत्यंत लाजिरवाणी ही गोष्ट आहे. त्यामुळे हा व्यवहार रद्द करण्याची विनंती ट्रस्टींना करण्याचं त्याचबरोबर ही प्रॉपर्टी ज्यांनी खरेदी केली आहे. त्या गोखले बिल्डर्सला देखील विनंती करण्याचा ठराव झाला.
एक तारखेपासून जे आंदोलन सुरू होणार होतं. त्यापूर्वी या सर्वांशी संवाद साधावा असं मला सगळ्यांनी सांगितलं. एक तारखेला गुप्तिनंदी महाराजांनी उपोषण सुरू केल्यानंतर संपूर्ण देशभरात आंदोलन केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. याची जाणीव केंद्र आणि राज्य सरकारला करून द्यावी असा निर्णय या बैठकीमध्ये झाला. आज दुपारी पत्रकार परिषद संपून कोल्हापूरला जाण्यापूर्वी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझ्याशी संपर्क साधला.
संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आणि जैन धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही गोखले बिल्डर्सला विनंती केलेली आहे की, हा व्यवहार त्यांनी रद्द करावा गोखले बिल्डर्सनी आमच्या विनंतीला मान देऊन एच एन डी ट्रस्टीना मेल करून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली आहे. हा व्यवहार रद्द करावा आणि जे 230 कोटी रुपये आम्ही ट्रस्टींना दिलेले आहेत अशी मागणी त्यांनी केली आहे जो मेल केला त्याची प्रत माझ्याकडे आलेली आहे. जरी गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. ते नाव कमी होऊन पुन्हा एचएनडी बोर्डिंगच नाव लागत नाही. आणि ही बोर्डिंग पुन्हा पूर्ववत होत नाही. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुन्हा सुरू होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की केवळ पत्रामध्ये दिलं म्हणून आमचा लढा संपणार नाही हा व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे सरकारने पुढाकार घ्यावा.
धर्मदाय आयुक्तांनी 28 तारखेला सुनावणी घेतलेली आहे. त्या सुनावणी दरम्यान आम्ही हे पत्र सादर करूच परंतु ते काहीही असलं तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. जैन बोर्डींग हे पूर्णतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मालकीच आहे. त्यांचा तो हक्क आहे अधिकार आहे तिथे असणाऱ्या मंदिरामध्ये पुण्याचे भाविक गेल्या 60 ते 65 वर्षांपासून येतात. तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे या ठिकाणची एक इंच जमीन सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे साडेतीन एकरच्या प्रॉपर्टीवरील गोखले बिल्डर यांचं नाव कमी होऊन hnd ट्रस्टीनच नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही.