पुणे: अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य होते.
पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न झाला. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.
या साखरपुड्यासाठी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.
जय हे उद्योग व्यवसायाबरोबरच राजकारणातही सक्रिय
जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. जय यांचा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला आहे. सध्या मुंबई, बारामती येथे ते व्यवसाय पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने ते ही राजकारणातही सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते आहे. या लोकसभेला त्यांनी आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती मतदार संघात प्रचार केला होता. तसेच विधानसभेला अजित पवार यांच्यासाठी ते बारामती शहरातून प्रचार करत होते.
कोण आहेत ‘ऋतुजा पाटील’?
जय पवार यांचे सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे फलटणचे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत होणार आहे. तर, जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांचा आज साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यानंतर आता दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून त्यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घराच्या सुनबाई आहे.