शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विलंब लागला तरी चालेल, लग्नाची घाई कुणाला? सध्याच्या तरूण - तरूणींची मानसिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:25 IST

पालकांकडूनही मुला-मुलींच्या लग्नासाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.

ठळक मुद्देलग्नापेक्षा मुली करिअरला अधिक प्राधान्यतरूणींच्या अपेक्षा पूर्ण करणे तरूणांसमोरचे मोठे आव्हान

पुणे : अहो, सविता आता पस्तीशीला आलीये; तिचं लग्न करायचंय का नाही? नक्की कुठं अडलंय? असा खोचक प्रश्न नातेवाईक किंवा शेजारच्या मंडळीकडून कुटुंबांना अनेकदा विचारला जातो. मात्र, तरूण-तरूणींना त्याची पर्वा नाही. गेल्या काही वर्षांमधला वाढत्या घटस्फोटांचा विचार करता ’लग्न’ म्हणजे तडजोड हेच आता तरूण-तरूणींना मान्य नाही. मनपसंद जोडीदार मिळण्यासाठी लग्नाला विलंब लागला तरी चालेल, हरकत नाही. इथं घाई कुणाला आहे? अशाप्रकारची मानसिकता तरूण पिढीमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांकडूनही मुला-मुलींच्या लग्नासाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.

एक काळ असा होता, वयाची विशी उलटल्यानंतर कुटुंबात मुली़च्या लग्नाची चर्चा सुरू होई. मुलीला जे काही पुढे शिकायचे आहे ते ती नव-याच्या घरी जाऊन शिकेल, अशी मुलींच्या आई-वडिलांची विचारसरणी होती. मात्र, लग्नापेक्षा मुली करिअरला अधिक प्राधान्य देऊ लागल्यानंतर हे चित्र काहीसे बदलत गेले. आज तरूणी तरूणांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. किंबहुना तरूणांपेक्षा जास्त कमवत आहेत. त्यामुळे करिअरिस्ट तरूणींच्या लग्नाच्या बोहल्यावर चढताना तरूणांकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत आणि या अपेक्षाच तरूणतरूणींच्या लग्नाच्या विलंबास कारणीभूत ठरत आहेत. तरूणींच्या अपेक्षा पूर्ण करणे तरूणांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे तर जोपर्यंत मनासारखी मुलगी मिळत नाही तोपर्यंत लग्नासाठी थांबण्याची तरूणांनी तयारी दर्शविली आहे.

''आजही पत्रिका बघूनच विवाह जुळविण्याकडे वधू-वरांच्या कुटुंबियांचा कल आहे. पत्रिका जुळत नसल्यामुळे अनेक तरूण-तरूणींच्या विवाहांना विलंब लागत आहे. यातच ओळखीमध्येच नातेसंबंध जुळले पाहिजेत अशी देखील त्यांची इच्छा आहे.  याशिवाय तरूण-तरूणींना जोडीदार सुंदरच हवाय. भावी पत्नी कमवती पाहिजे अशी तरूणांची अपेक्षा आहे तर पत्नी कमावती हवी असेल तर माझ्यापेक्षा भावी पतीचे पँकेज हे दुप्पट हवे असा तरूणींचा हट्ट आहे. पुण्याचा विचार केला तर तरूणींना पुण्यातलाच जोडीदार हवाय आणि तो देखील एकाच क्षेत्रातला असावा असा त्यांचा आग्रह आहे.  तरूण-तरूणींना जोपर्यंत हवा तसा जोडीदार मिळत नाही तोपर्यंत त्यांचे पालक देखील विवाहासाठी अटटहास करत नाहीत अशी माहिती वधू वर सूचक केंद्राच्या विराज तावरे यांनी दिली.''  वय वाढले म्हणून कुणाच्याही गळ्यात वरमाला का घालायची

''मला मनासारखा जोडीदार हवा आहे. उगाचच लग्नासाठी तडजोड करणे मला पटत नाही. वरासाठीची शोध मोहीम सुरू आहे. वय वाढले म्हणून कुणाच्याही गळ्यात वरमाला का घालायची? मी स्वत: कमावते. त्यामुळे मी स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे. जेव्हा मनपसंद जोडीदार मिळेल तेव्हा लग्न करेन. मला लग्न करण्याची मुळीच घाई नसल्याचं अपर्णा मोघे म्हणाली.'' 

तरुणींच्या अपेक्षाच खूप वाढल्या आहेत 

''आजच्या काळात तरूणींच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. तरूणाचा पुण्यामुंबईत फ्लँट हवा. त्याला इतकेच पँकेज हवे. घरात सासू-सासरे नकोत. सुरूवातीलाच तरूणी त्यांच्या अपेक्षा सांगत असल्याने मग पुढे नातं जुळवण्याचा प्रश्नच येत नाही. यातच  माझा आणि आमच्या कुटुंबाचा पत्रिकेवर अधिक विश्वास आहे. पत्रिका जुळत असेल तरच आम्ही पुढची बोलणी करतो. अनेकदा त्या जुळतात पण स्वभाव, आवडीनिवडी जुळत नाहीत. त्यामुळे विवाह जुळण्यास अडचणी येत असल्याचे संग्राम मुळेने सांगितले आहे.'' 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नSocialसामाजिकFamilyपरिवार