शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:51 IST2025-09-30T10:51:08+5:302025-09-30T10:51:49+5:30
आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या.

शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील
पुणे : शंभरावा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा केला जाईल तेव्हा भारत देश जगात अव्वल स्थानी असेल, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशाला दाखवले आहे. इतकेच नाही तर तसा कृती कार्यक्रम ठरवून दिला असून, विकासाचे २०२९, २०३५ आणि २०४७ असे टप्पे पाडले आहेत. शासकीय विद्यापीठांना घेऊन ही वाटचाल करायची तर आणखी शंभर वर्षे लागतील. त्यामुळे आम्ही खासगी, स्वायत्त विद्यापीठे व महाविद्यालयांना प्राेत्साहन देत आहाेत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी (दि. २९) स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रमोद रावत, ॲड. अशोक पलांडे, आनंद काटेकर, रवींद्र आचार्य, स्वाती ढोबळे, जगदीश कदम, अनंत जोशी, डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. संजीवनी शेळके, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते. अनंत जोशी यांनी आभार मानले.
बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा हाॅलमध्ये सोमवारी सायंकाळी ५:०० वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते. जर्मनी हा म्हाताऱ्यांचा देश होत आहे. त्यांना भारताकडून ४ लाख कुशल मनुष्यबळ हवे आहे. पण, आतापर्यंत आपण फक्त १० हजार लोक पुरवू शकलाे. ते जर्मन भाषा शिकून जर्मनीला गेले. जपानलासुद्धा कौशल्य असलेले मनुष्यबळ हवे आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी स्वायत्त विद्यापीठे जन्माला आली. आम्ही तब्बल १८ स्वायत्त विद्यापीठे तयार केली. तसेच ४०० महाविद्यालये स्वायत्त केली. सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने धाेरण ठरविण्याकरिता त्यांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच डीईएस साेसायटीत निवासी बीएड शिक्षण सुरू झाले. स्किल डेव्हलपमेंटला प्राधान दिले जात आहे, असेही ते म्हणाले.
आपल्याकडे सर्रासपणे म्हटले जाते, आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या, असा सल्ला मी दिला आहे. त्यानुसार स्वायत्त संस्था कामाला लागल्या आहेत. - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री