शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

साडेदहा लाख टन गाळप करणार

By admin | Updated: October 27, 2015 00:45 IST

हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही

नारायणगाव : हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल. या हंगामासाठी आपण ३०२ ट्रक/टोळ्या व १२५० टायरगाडीचे नियोजन केलेले आहे. तसेच ५ ऊसतोडणी यंत्रे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी सज्ज झालेली आहेत, असे मत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केले.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. एकरी जास्तीतजास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या ५१ ऊसउत्पादकांच्या हस्ते या हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कलावती हरिभाऊ चव्हाण या होत्या.या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सुमित्राताई शेरकर, आमदार शरद सोनवणे, अशोक घोलप, आशाताई बुचके, सुरेखाताई मुंढे, तात्यासाहेब गुंजाळ, संजय काळे, रघुनाथ लेंडे, संगीता वाघ, संतोष वाघ, शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे, राजाराम महाराज जाधव, नंदूकाका शेरकर, तान्हाजी बेनके, गणेशभाऊ कवडे, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे वैभव तांबे, राजेंद्र बनकर, अजित काळे, हनुमान हांडे, अजितकाका परदेशी आदी उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना शेतकरी मोहन थोरात म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करणे ही संकल्पना अध्यक्ष सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाने राबवून शेतकऱ्यांना सन्मान दिल्याने आम्ही भारावून गेलो आहे. कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या या सन्मानामुळे आम्हाला शेती व्यवसायाकरिता अधिक प्रेरणा मिळणार. कलावती चव्हाण म्हणाल्या, गेली ३५ वर्षांपासून मी काळ्या आईची सेवा म्हणून शेती व्यवसाय करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून ऊसपीक व्यवस्थापनाबद्दल होत असलेल्या मार्गदर्शनामुळेच मी विक्रमी ऊस उत्पादन घेऊ शकले. कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आणि संचालक मंडळाकडून आमचा बहुमान केला त्याबद्दल धन्यवाद. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक घोलप यांनी आभार मानले. (वार्ताहर)