शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

दहावी - बारावीत क्रीडा गुण मिळवणे होणार कठीण : शिक्षण विभागाने बदलला नियम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:59 IST

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत.

पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत विविध खेळप्रकारांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा विचार होणार आहे, मात्र त्यांनी इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये त्या खेळप्रकारामध्ये सहभाग घेतला असणे आवश्यक असणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
           दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होणारे खेळाडू विद्यार्थी तसेच एनसीसी, स्काऊट गाइडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेल्या ११ खेळप्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेले असल्यास त्याचाच विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १० पर्यंत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असल्यास शासनाच्या परिशिष्ट ६ मधील तरतुदीनुसार त्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जाणार आहेत. मात्र त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये असताना त्या विद्यार्थ्यांने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ वीमध्ये गुणांची सवलत मिळविताना त्याने बारावीमध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. 
           खेळाडू कोणत्याही जिल्हयातून खेळला असला तरी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हयाच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यास प्रमाणित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले असले तरी त्याने ज्या उच्चतम असणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला त्या एकाच सवलतीचे गुण त्याला दिले जातील. जिल्हा क्रीडा अधिकारी  त्यांना शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून ३० एप्रिल पूर्वी ते संबंधित विभागीय मंडळास शिफारशींसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणSSC Results 2018दहावी निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा