शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ कदमच होता!

By admin | Updated: January 8, 2015 23:08 IST

संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील आरोपी विश्वास हिंदुराव कदम याची येरवडा कारगृहात ओळख परेड घेण्यात आली,

पुणे : संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील आरोपी विश्वास हिंदुराव कदम याची येरवडा कारगृहात ओळख परेड घेण्यात आली, तेव्हा तीन साक्षीदारांनी त्याला ओळखले होते. वढू फाट्याजवळून तिघे मित्र त्यांच्या तवेरा मोटारीतून जात असताना तेथे उभ्या असलेल्या इंडीका कारने अपरडीपर दिल्याने त्यापैकी एक जण तेथे गेला . तेव्हा कदम एका स्त्रीबरोबर मागील बाजूला बसला होता, अशी साक्ष त्या साक्षीदाराने दिली होती. या ओळख परेडचा आपण पंचनामा केला होता, अशी साक्ष विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या न्यायालयात दिली. या प्रकरणाची बुधवारी सुनावणी झाली.विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी डी. एम. बनसोडे यांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. बनसोडे यांनी कदम याच्या ओळख परेडचा पंचनामा केला होता. १० जानेवारी २०१० रोजी ओळख परेड घेण्यात आली होती. बनसोडे यांची सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी साक्ष घेतली.येरवडा तुरुंगात इतर आरोपींसह कदम याला ओळख परेडसाठी उभे करण्यात आले होते. या आरोपींमधून कदमला एका व्यक्तीने ओळखले. घटनेच्या दिवशी वढू फाट्याजवळ आरोपींनी त्यांची इंडिका कार उभी केली होती. त्याच वेळी तिघे मित्र त्यांच्या तवेरा गाडीतून तेथून जात होते. इंडिका कारने अपरडीपर दिल्याने, त्या मित्रांपैकी एक जण कारजवळ गेला तेव्हा आरोपींनी कारमध्ये एका महिलेला आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने मागील बाजूस पाहिले तेव्हा कदम हा एका महिलेबरोबर बसलेला दिसला. अशा रीतीने त्याने ओळखले होते. कदमच्या ओळख परेडमध्ये ओळखण्यात आल्याचा पंचनामा आपण केला होता; तसेच त्याचे सर्टिफिकेट दिले होते, असे बनसोडे यांनी साक्षीत सांगितले. (प्रतिनिधी)राऊतला हवी जन्मकुंडलीया खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असल्याने त्याने त्याची जन्मकुंडली येरवडा कारागृहात मागवली आहे. ती राऊतला देण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून राऊतच्या भावाने न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने तो परिक्षा देणार आहे का अशी विचारणा केली. मात्र परिक्षा देणार नसल्याने परवानगी देता येणार नाही. ‘जेल मॅन्युअल’नुसार त्याबाबतचा तुरूंग अधिकाऱ्यांना विचारणा करावे असे न्यायालयाने नमूद केले.