Video: 'कुणी स्टेट्स ठेवले म्हणून आरोप करावेत हे चुकीचे आहे', भिगवण प्रकरणावर राहुल कुल यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:48 IST2026-02-20T18:46:41+5:302026-02-20T18:48:14+5:30

आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो माझ्याही घरात मुली आहेत. त्यांच्या घरात मुली आहेत. त्यांनी वस्तुस्थिती पाहून आरोप करावेत.

'It is wrong to accuse someone just because they have a status', Rahul Kul's reaction on the Bhigwan case | Video: 'कुणी स्टेट्स ठेवले म्हणून आरोप करावेत हे चुकीचे आहे', भिगवण प्रकरणावर राहुल कुल यांची प्रतिक्रिया

Video: 'कुणी स्टेट्स ठेवले म्हणून आरोप करावेत हे चुकीचे आहे', भिगवण प्रकरणावर राहुल कुल यांची प्रतिक्रिया

पुणे :  भिगवण परिसरात २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती समोर आली. मात्र या घटनेला आता धक्कादायक वळण समोर आले. त्या तरुणी आणि तरुणाचा एका व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याने तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. त्यानंतर तरुण आणि तरुणी बारामती पोलीस स्टेशनला हजर झाले. तेव्हाही तरुणीने जाहीर शेख यांच्यासोबत १ वर्षांपासून प्रेमसंबंधात असल्याचे सांगितले. 

आता या घटनेला राजकीय वळण आले असून दौंडचे आमदार राहुल कुल यांचे नाव आले आहे. प्रियकराचा चुलता अझर शेख हा राहुल कुल यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या अझर शेखने व्हॉट्सअप स्टेटसला राहुल कुल यांचा फोटो ठेवला होता. त्यामुळे या प्रकरणात कुल यांनी तरुणाला मदत केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. यावरून राहुल कुल यांनी माध्यमांशी संवाद साधला.  कुणी स्टेट्स ठेवलं म्हणून माझ्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

मुलीच्या कुटुंबियांनी केलल्या आरोपाबाबत आमदार राहुल कुल म्हणाले, परवा भिगवण येथे तरुणीची तक्रार आली. यामध्ये जो गुन्हा दाखल झाला. यामध्ये पोलीसांच्या सातत्याने संपर्कात राहुन त्याच बरोबर मुलीच्या मामा, नातेवाइकांच्या संपर्कात राहुन सातत्याने त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही प्रशासनाने केलेला आहे. काल त्या मुलीचा शोध घेइपर्यंत पोलीस प्रशासनाला दर एक दोन तासांला फोन करीत कारवाईच्या स्वत्: सुचना केल्या आहेत. मुलगी मिळाल्यावर आज जे काही आरोप झाले. त्याबद्दल एवढेच सांगेन, या परिसरात आम्ही सामाजिक जाणीव ठेवून काम करताे. त्यामुळे कोणी काही आरोप करत असेल तर मलाही नमुद करायचे आहे, मला देखील एक मुलगी आहे. माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेल्या आहेत. त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची मला जाणीव आहे.आणि कदाचित आज कोणी स्टेटस ठेवला. हा जो विषय घडला ,या प्रकरणात मुलीच्या बाजुने भक्कम भुमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं,अस माझं प्राथमिक मत आहे. पण या सगळ्या प्रकरणाची चाैकशी पोलिसांनी करावी.त्याचबरोबर जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी सातत्याने केली आहे.

आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थिती पाहुन आरोप करावा, अशा प्रकारची विनंती मी निश्चित करेन. त्या कुटुंबियांविषयी आम्ही सर्वजण सहानुभुतीपुर्वक मदतीच्या भुमिकेत आम्ही आहोत. त्या कुटुंबाला जी मदत लागेल ती करण्याची आमची तयारी आहे. प्रशासन संपुर्णपणे काम करीत आहे. प्रशासनाकडुन मुलीची समजुत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या कुटुंबाला आवश्यक पाठबळ देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. त्यामुळे कोणी असा समज पसरवत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत. आणि माझ्याहि घरात मुली आहेत.आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून आरोप करावेत,असे माझे नम्र आवाहन आहे. माझी निपक्षपाती भुमिका असल्याने काही लोक दुखावले असावेत,त्यामुळे काही लोकांनी असे आरोप करीत राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा,असे माझे मत आहे. मुळात आरोपीला मी ओळखत नाही, गुन्हा भिगवण (ता.इंदापुर) येथे घडलाय,मुलगी बारामतीत हजर झाली आहे. त्यामुळे कोणी कोणाचं स्टेटस ठेवावं, त्यामुळे कोणावर आरोप करावेत याचा सुतराम संबंध मला समजत नाही,असे आमदार राहुल कुल म्हणाले. कोणी कोणाच स्टेटस ठेवल्याने हे आरोप करावेत हे योग्य नाही. यामध्ये राजकारण केले जात असल्याचा संशय आमदार कुल यांनी व्यक्त केला आहे. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाइ करावी.मुलीच्या कुटुंबियांच्या संपर्कात मी आहे.त्यांची भेट घ्यायला मला आवडेल.त्यांना सर्व बाजुने मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करु, असे देखील कुल म्हणाले.

Web Title : स्टेटस अपडेट के आधार पर आरोप गलत: राहुल कुल का भिगवन मामले पर बयान

Web Summary : विधायक राहुल कुल ने भिगवन अपहरण मामले में शामिल होने से इनकार किया। उन्होंने कहा कि उन्होंने केवल लड़की के परिवार को मदद की पेशकश की और गहन पुलिस जांच की मांग की। कुल ने एक परिचित द्वारा अपनी तस्वीर को स्टेटस के रूप में प्रदर्शित करने के कारण आरोपी का समर्थन करने के आरोपों का खंडन किया।

Web Title : Accusations based on status updates are wrong: Rahul Kul on Bhigwan case.

Web Summary : MLA Rahul Kul denies involvement in the Bhigwan abduction case. He claims he only offered help to the girl's family and demands a thorough police investigation. Kul refutes allegations of supporting the accused due to a shared acquaintance displaying his photo as status.