हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:26 IST2025-02-06T15:25:54+5:302025-02-06T15:26:55+5:30
पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही

हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
- जयवंत गंधाले
हडपसर : हडपसर परिसरातील छोट्या कालव्यांतून पिण्याची पाण्याची वहिनी गेली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. पिण्याच्या पाण्याची वहिनी कचऱ्यामध्ये गाडली गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हडपसर परिसरातली ही जीबीएसचा धोका उद्भवू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही. कोरड्या पडलेल्या कालव्यात मात्र कचऱ्याचे ढीग च्या ढीग उभे राहिले आहेत. सिंहगड रस्ता धायरी भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात जीबीएस ह्या नवीन आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे तसाच धोका हडपसर परिसरात देखील होईल अशी भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कालव्यात कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंड करण्यात यावा जेणेकरून कालव्यात कोणीही कचरा टाकणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उपद्रवी नागरिकांना शिस्त लागेल अशी भावना हिरालाल अग्रवाल यांनी मांडली. आरोग्य अधिकारी म्हणतात की, कालव्याची स्वच्छ करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे असे बोलून वेळ मारून देतात. त्यामुळे कालवा परिसर, साडेतेरा नळी, रामोशी आळी, पांढरे मळा, गाडीतील, साने गुरुजी रुग्णालय मागील परिसर, साडे सतरा नळी येथेपर्यंत संपूर्ण कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे.
वारंवार तक्रारी करूनदेखील आरोग्य विभाग , वरिष्ठ आरोग्य अधिकारी , कनिष्ठ अधिकारी , कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात. घनकचरा विभागातर्फे डीप क्लीन संकल्पना राबविली जात आहे. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून फिरवले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र हडपसर मध्ये डीप क्लीन कालवा परिसरात का नाही झाले याचे उत्तर द्यावे. - संदीप निगडे
अस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजार होतात.त्याचा खर्च ही सर्व सामान्य नागरिकाला परवडत नाही . मूलभूत गोष्टी आम्हाला वांरवार हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे जाऊन तक्रार नोंदवावी लागते .आरोग्य अधिकारी कर्मचारी उलटसुलट उत्तरे देतात. त्यामुळे हडपसर बकाल होत चालले आहे. - किरण बोरावके, शेवाळेवाडी ग्रामस्थ
हडपसरमधील कालवे यांची दररोज स्वच्छता करावी. नागरिकांना आणि अधिकारी यांना शिस्तीचे धडे द्यावेत. कालव्यातील पाणी शेतीला वापरले जाते. त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिक अधिकारी सर्वांनी कायद्याचे पालन करावे. -बाळासाहेब भिसे, शेतकरी
कचरा संकलन सूक्ष्म व्यवस्थापन योजना आखून प्रत्येक नागरिकांना कडून कचरा उचलण्याची सोय नागरिकांना करून द्यावी, जेणे करून नागरिक बाहेर कोणत्याही ठिकाणी कचरा टाकणार नाही. यासाठी नागरिक, पुणे मनपा, स्वच्छतादुत, कचरा वेचक यांच्यात समन्वय साधावा. -दीपाली माटे