पुणे : सात जणांचं कुटुंब एका चारचाकी वाहनातून ते पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे साडे चारच्या सुमारास त्यातील ड्रायव्हरला चहा पिण्याची तलप होते. आणि हे कुटुंब एका टपरीजवळ थांबले. त्याचवेळी यांच्यासोबत एक भयानक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या अंगांवरचे दागिने घेतले. इतकंच नाही, तर या कुटुंबीयांसोबत असलेल्या एका सतरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातोय.
दौंड येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातल्या अलका टॉकीज हे आंदोलन करण्यात आले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता. वारी दरम्यान या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असून सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप गुलाबो गँग या संघटनेने केला आहे, गुलाबो गॅंगने राज्य सरकार विरोधात बॅनरबाजी करत रस्त्यावर आंदोलन केले. महिला आयोग झोपले काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय अशा घोषणाबाजी करत अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून निषेध करण्यात आले.