IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 12:21 IST2021-10-16T11:49:46+5:302021-10-16T12:21:20+5:30
आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवीच्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे

IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष
पिंपरी : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) शैलीदार फलंदाज ऋतूराज गायकवाड (ruturaj gaikwad) याच्या कामगिरीबद्दल शहरवासीयांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत राहणा-या ऋतुराजने आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट वर्तुळात स्वताचा ठसा उमटवला. जुलै महिन्यात ऋतुराजने वन डे व टी 20 सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड झाली होती.
पिंपरी चिंचवडचा पहिला खेळाडू
पिंपरी चिंचवड शहरामधून भारतीय संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारा ऋतुराज पिंपरी-चिंचवडचा पहिला खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव नेमाने हे ऋतुराजचे मुळगाव वडील नुकतेच लष्कर सेवेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले तर आई शिक्षिका व गृहिणी आहे. या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना सर्वाधिक ६३५ धावा करून ऑंरेज कॅपचा मानकरी ठरला आहे.
मधुबन जुनी सांगवीच्या मातीत वाढलेल्या मराठमोळ्या खेळाडूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवीच्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे. त्याने पिंपरी-चिंचवडच्या व्हेराक-वेंगसरकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे घेतले आहेत.