एलबीटीवर चर्चेसाठी व्यापाऱ्यांना निमंत्रण

By Admin | Updated: June 12, 2014 05:02 IST2014-06-12T05:02:05+5:302014-06-12T05:02:05+5:30

महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिकेत बैठक बोलावली आहे

Invitation to Traders to discuss LBT | एलबीटीवर चर्चेसाठी व्यापाऱ्यांना निमंत्रण

एलबीटीवर चर्चेसाठी व्यापाऱ्यांना निमंत्रण

पुणे : महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिकेत बैठक बोलावली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांसमोर महापालिकेची
बाजू मांडण्यात येणार असल्याचे कोद्रे यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी राज्य शासनाने जकात रद्द करून एलबीटी लागू केला आहे. मात्र, या कायद्यातील अटी जाचक असल्याने एलबीटीही रद्द करण्याची मागणी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार, हा कर रद्द करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्यानंतर राज्यातील एलबीटी लागू असलेल्या बहुतांश महापालिकांनी तो रद्द करू नये; अन्यथा महापालिकांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भूमिका घेऊन एलबीटी रद्द करण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यामुळे राज्य शासनाची कोंडी झाली असून, नुकत्याच मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांच्या बोलावलेल्या बैठकीत शहरातील व्यापारी संघटनांची बैठक घेऊन एलबीटीबाबतचा निर्णय राज्य शासनाला कळवावा, अशा सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न महापालिकांकडे टोलवल्यानंतर शहरातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली, तसेच या बैठकीला अर्थ नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिका पदाधिकारी आणि अधिका- ऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर व्यापारी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Invitation to Traders to discuss LBT