शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

निवृत्त न्यायाधीशांमार्फत टोलवसुलीची चौकशी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 12:15 IST

प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने, टोलेबल वाहनसंख्या, जमा टोल या सगळ्यात गोंधळ राज्यपालांकडे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांची मागणी

ठळक मुद्देराज्यपालांकडे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांची मागणी द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीचे कंत्राट २००४ मध्ये १५ वर्षांसाठी कंत्राट

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीतील रक्कम व वाहनांच्या संख्येत मोठा फलक असल्याने या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीचे कंत्राट २००४ मध्ये १५ वर्षांसाठी कंत्राटदाराला दिले होते. त्याची मुदत दि. ९ ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यानंतरही १० ऑगस्टपासून दुसऱ्या कंत्राटदाराला तात्पुरते कंत्राट देऊन टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. आधीच्या कंत्राटदाराने एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत मिळून मार्गावर प्रतिमहिना सरासरी ४३ लाख वाहने धावल्याचे दाखविले आहे. नवीन कंत्राटदाराने सप्टेंबर महिन्यात या रस्त्यावरून १६.९० लाख वाहने धावल्याचे दाखवले आहे, तर ऑक्टोबर महिन्यात रस्त्यावरून १९ लाख वाहने धावली असून, त्यांच्याकडून ६७ कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या या रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही जमा झालेल्या टोलची रक्कम मात्र जवळपास सारखीच असल्याचे वेलणकर यांनी सांगितले...........प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने, टोलेबल वाहनसंख्या, जमा टोल या सगळ्या आकड्यांचा मेळ जुळतच नाही. या रस्त्यावरील टोलमधील झोलची चौकशी करण्याची मागणी गेली चार वर्षे सरकारकडे करीत आलो आहोत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता राष्ट्रपती राजवटीमुळे आपल्याकडे राज्याचा कारभार आला आहे. त्यामुळे या आकडेवारीच्या गौडबंगालाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.

टॅग्स :PuneपुणेVivek Velankarविवेक वेलणकरtollplazaटोलनाकाfraudधोकेबाजी