Pune: पत्नीचा अपमान करणे पतीला पडले महागात; पतीवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:15 IST2021-12-21T13:13:01+5:302021-12-21T13:15:07+5:30

पुणे : तू अंधी है, डबल बॅटरी है’, ‘तेरी यहाँपर नांदणे की औकात नही’ अशा पद्धतीने अपमानित करीत पत्नीचा ...

insulting wife husband court orders to file charges against husband pune crime news | Pune: पत्नीचा अपमान करणे पतीला पडले महागात; पतीवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Pune: पत्नीचा अपमान करणे पतीला पडले महागात; पतीवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे : तू अंधी है, डबल बॅटरी है’, ‘तेरी यहाँपर नांदणे की औकात नही’ अशा पद्धतीने अपमानित करीत पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या आणि तिला तोंडी तलाक देत घराबाहेर काढणाऱ्या पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. पाटील यांना हा आदेश दिला.

पती मोहसीन इद्रिस खान ऊर्फ राज, सासू शाकिराबी इद्रिस खान, सासरे इद्रिस खान, नणंद वसिया इद्रिस खान, दीर फिरोज इद्रिस खान, दीर असीम इद्रिस खान, नणंद फौजीया आसिफ शेख, नंदावा आसिफ शेख, मामी सासू सुमय्या सलमान शेख, मामी सासू नसरीन इरफान शेख, आसिफ खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने स्वारगेट पोलिसांना दिला आहे. याबाबत विवाहितेने ॲड. साजिद शाह यांच्यामार्फत न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

मोहसीन आणि तक्रारदार महिला यांचा २०१६ साली विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला आरोपींनी फिर्यादींना काही दिवस चांगले वागवले. त्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. लग्नात दागिने नाही दिले म्हणून सासरच्यांनी त्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना तोंडी तलाक देत घराबाहेर काढले, असे महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे.

Web Title: insulting wife husband court orders to file charges against husband pune crime news