शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सासवडमध्येच कचरा जिरवा

By admin | Updated: October 26, 2015 01:54 IST

कुंभारवळण येथील प्रस्तावित सासवड शहराच्या कचरा डेपोला कुंभारवळण व येथील एखतपुर-मुंजवडी, खळद, वनपुरी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी विरोध केला.

सासवड : कुंभारवळण येथील प्रस्तावित सासवड शहराच्या कचरा डेपोला कुंभारवळण व येथील एखतपुर-मुंजवडी, खळद, वनपुरी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी विरोध केला. वेळ प्रसंगी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय रविवारी (दि. २५) कचरा डेपोच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी घेतला. सासवड नगरपालिकेला हरित लवाद न्यायालयाने कचरा डेपो संदर्भात निर्देश दिल्यानुसार या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शासनाच्या वतीने नायब तहसीलदार सुनंदा भोसले-पाटील, माजी आमदार चंदुकाका जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड आदींसह नगरसेवक या परिसरातील सात गावांतील आजी-माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सन २००९ पासून झालेल्या कचरा डेपोच्या विविध टप्यांची मुख्याधिकारी दुर्वास यांनी बैठकीच्या सुरुवातीस माहिती दिली. हा कचरा डेपो नसून जैव यांत्रिकी खतनिर्मिती प्रकल्प असून त्याचा या परिसरातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही हे स्पष्ट केले. हरित लवाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नगरपालिकेस पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त असल्याचे दुर्वास यांनी सांगितले. कचरा डेपोमुळे येथील शेती, पिण्याचे पाणी, पर्यावरण, वन्यजीव तसेच समाजजीवनावर परिणाम होईल. भविष्यात शेतीला कवडीमोल किंमत राहील व येथील गरीब शेतकरी वर्ग दुष्ट चक्रात अडकेल अशी धास्ती या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. सासवड नगरपालिकेने त्यांचा कचरा डेपो अन्य कोठेही उभारावा व येथील जनतेला न्याय द्यावा. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी या वेळी दिला. परिसरातील ग्रामपंचायतींच्या कचरा डेपोविरोधातील ठरावाच्या प्रती या वेळी मुख्याधिकारी दुर्वास यांना ग्रामस्थांनी दिल्या. प्रमोद कामठे, महादेव टिळेकर, अमोल कामठे, सचिन पठारे, संतोष हागवणे, रामदास होले, प्रशांत कुंभारकर, समीर कुंभारकर, रामभाऊ झुरंगे, मुरलीधर झुरंगे, उमेश कामठे, सुरेश रासकर, रूपाली टिळेकर, श्रीकांत ताम्हाणे, या आजी-माजी सरपंच व सदस्यांसह सुनील धिवार आणि पं. स. सदस्य दत्ता झुरंगे यांनी या वेळी आपल्या जळजळीत प्रतिक्रिया प्रशासनासमोर व्यक्त केल्या. सुनंदा पाटील यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी शासनदरबारी मांडून मार्ग काढला जाईल असे सांगितले. माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप यांनी पालिकेची भूमिका ग्रामस्थांसमोर स्पष्ट केली.