मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगाराला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:30 IST2025-02-07T12:29:47+5:302025-02-07T12:30:25+5:30

लग्न न करता त्यांची आर्थिक फसवणुक केलेबाबत गुन्हा दाखल होता.

Insane criminal arrested for befriending women and defrauding them through the MetroMoney site | मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगाराला अटक 

मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगाराला अटक 

- जयवंत गंधाले

हडपसर :
मेट्रोमनी साईटवरुन महिलांशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार परराज्यातून काळेपडळ पोलीसांनी शिताफिने शोधून त्याच्या मुसक्या आवळाल्या. काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये महिला फिर्यादी यांचे सोबत आरोपी नामे अमन प्रेमलाल वर्मा वय ३८ वर्षे, रा. वॉर्ड नं.८ हाउस नंबर ५२ बिश्ना जि. जन्म काश्मिर याने संगम डॉट कॉम मेट्रोमनी साईटवरुन संपर्क साधुन, फिर्यादीस लग्नाचे खोटे अश्वासन देवुन फिर्यादीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केला.

त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी कडुन ऑनलाईन व रोख स्वरुपात सुमारे ४५ लाख रुपये घेवुन फिर्यादीसोबत लग्न न करता त्यांची आर्थिक फसवणुक केलेबाबत गुन्हा दाखल होता. या गुन्हयाचे तपासात पाहिजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, तो सोशल मिडीयावर अथवा मेट्रोमनी साईटवर फेक आयडी तयार करुन महिलांशी मैत्री व जवळीक निर्माण करत असे. आपल्या जाळयात फसवुन त्यांना लग्नाचे अमिष दाखवुन शारीरीक संबंध ठेवुन त्याना ब्लॅकमेल करुन तो करत असे.त्यांचेकडुन ऑनलाईन व रोख स्वरुपात रक्कम घेवुन फसवणुक करत असलेबाबत निष्पन्न झाले होते.

या आरोपी विरुध्द दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्हयाचे तपासात गुप्त बातमीदार यांचेकडुन गुन्हयातील पाहिजे आरोपी हा इंदोर मध्यप्रदेश येथे येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाली होती. या बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करुन, वरिष्ठांचे पुर्व परवानगी घेवुन काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक इंदोर येथे गेले. स्थानिक पोलीस मदतीने व तांत्रिक तपसावरुन आरोपी अमन प्रेमलाल वर्मा यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याला काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणुन गुन्हयाचे तपासकामी अटक करुन न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता १० तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक विलास सुतार, करीत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.

Web Title: Insane criminal arrested for befriending women and defrauding them through the MetroMoney site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.