शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरणात धनाढ्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: June 18, 2015 23:50 IST

पवना धरण जलाशयाच्या ५०० मीटर क्षेत्रात मुंबई येथील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. पाटबंधारे प्रशासनाला न जुमानता भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पवनानगर : पवना धरण जलाशयाच्या ५०० मीटर क्षेत्रात मुंबई येथील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. पाटबंधारे प्रशासनाला न जुमानता भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शासनाने पाणीसाठा करण्यासाठी धरण पात्रातील गाळ काढण्याची मोहीम गेली पाच वर्षे हाती घेतली आहे. धरण व पाणी साठवण क्षेत्रातील गाळ काढून जास्तीत जास्त पाणीसाठा करण्याचा शासन प्रयत्न करत आहे. मात्र, धरणाच्या जलाशयाच्या ठिंकाणी ठाकूरसाई गावानजीक संपादित क्षेत्रात काही ठिकाणी मुरूम व मातीचा मोठा भराव टाकण्याचे काम चालू आहे. यामुळे पाणी साठवण्याचे काही क्षेत्र कमी होणार आहे. मुंबई येथील अनेक धनाढ्यांनी जलाशयाच्या कडेच्या संपादित व बिगर संपादित जमिनी खरेदी करून मोठे बंगले उभारले आहेत. जलाशयाचे सहज दर्शन होईल अशा ठिकाणी हे बंगले उभारले आहेत किंवा बुडीत क्षेत्रातच अनेक ठिकाणी अतिक्र मण केले आहे. शिवाय, या बंगल्याचे सांडपाणीदेखील धरणाच्या पाण्यात सोडले आहे. जलाशयाच्या कडेला अनेक अनधिकृत कामे केवळ पाटबंधारे विभागाची दिशाभूल करून किंवा तेथील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सुरू आहे. शासन पातळीवर याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे व अतिक्रमणे करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने आता धरणच बुजवण्याचे काम सुरू आहे. हे जर रोखले गेले नाही, तर धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होईल व पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवेल. धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळावे म्हणून पवना भागातील ३ शेतकऱ्यांना पाण्यासाठीच्या लढ्यासाठी बलिदान द्यावे लागले. हेच पाणी साठवण होत असलेल्या ठिकाणी चक्क भराव ठाकून धरण बुजवण्याचे काम करणाऱ्यावर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)