शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

पर्यावरण बदलाची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी : प्रा.डॉ.सतीश पांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 7:22 PM

सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते..

ठळक मुद्दे आरबीएसकडून  ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानितपर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज

पुणे : दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे. आसपासचे वन्य,प्राणीजीवन यावर त्याचा आमुलाग्र परिणाम होत आहे. या सगळयात पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आता लोक त्यात यायला तयार आहेत. मात्र, त्याकरिता त्यांच्यापर्यंत पोहचण्यची आवश्यकता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देत त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधावा लागेल, असे मत पक्षीतज्ञ, पर्यावरणप्रेमी प्रा.डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले. आरबीएस (रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड) कंपनीचे इनोव्हेशन आणि ऑपरेशन केंद्र असलेल्या आरबीएस इंडिया कंपनीने यांच्यावतीने इला फाऊंडेशनला नुकतेच  ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक डॉ. पांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळा दिल्लीत पार पडला. यानिमित्ताने संवाद साधण्यासाठी व पुरस्काराविषयीची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आरबीएस फाऊंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरबीएस इंडियाचे सस्टेनिबिलीटी प्रमुख एन. सुनील उपस्थित होते. पांडे म्हणाले, आगामी काळात लहान मुले, तरुण यांना डोळ्यासमोर ठेऊन पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांची मांडणी करावी लागेल. सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते. ती आणखी जोपासण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. डॉ. पांडे यांनी नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत एका पर्यावरणविषयासंबंधी सामंजस्य करार केला आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांना माती, पाणी, याबरोबरच सेंद्रीय, असेंद्रीय रसायने त्याचा होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यात येणार आहे.  तापमानात झालेला बदल, त्याचा दैनंदिन जीवनमानावर होणारा परिणाम तसेच पर्यावरणातील विविध घटकांचा होणारा -हास या गोष्टी पुरस्कारात विचारात घेतल्या जातात.  पर्यावरणाबाबत गांभीर्याने विचार करुन नवीन काही घडवू पाहणा-यांना बळ देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. यासाठी केवळ जंगलेच नव्हे तर दुर्गम भागातील खेड्यापर्यत पोहचून तेथील पर्यावरण समजून घेण्याकरिता सहकार्य केले जाते. गतिमान विज्ञान तंत्रज्ञानाची पावले ओळखुन पर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येते, असे एन. सुनील यांनी या वेळी सांगितले. 

* आरबीएस अर्थ हिरोज पुरस्कार 2019 चे विजेतेविजेते                          ठिकाण                           पुरस्कार विभाग 

प्रमिला बिसोई             ओडिशा                                जीवन गौरव भुलो अबरार खान         राजस्थान                           ग्रीन वॉरियर दिम्बेश्वर दास             आसाम                         ग्रीन वॉरियर ऐश्वर्या माहेश्वरी          उत्तरप्रदेश                       सेव द स्पेशिजएस सतीश                  तामिळनाडू                    सेव द स्पेशिजजलाल उद दीन बाबा    काश्मिर                        इन्स्पायर

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण