शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:03 IST

राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली असून काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे

पुणे : मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यात काही भाज्यांचे नुकसान झाले आहे, तर काही भाज्यांची तोडणी थांबली आहे. त्यामुळे एकीकडे बाजारातील फळभाज्यांची आवक घटली असून दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या दराने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे दराची स्थिती काही दिवस टिकून राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून सुमारे ९० ट्रकची आवक होते. गेल्या काही दिवसांत ही आवक घटली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली आहे, तर काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सद्यस्थितीत बाजारात विक्रीसाठी दाखल होत असलेल्या भाज्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला अधिकचा दर मिळत असल्याने सध्या पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.पावसाच्या विश्रांतीनंतर ही भाज्या महाग

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यासह विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. या पावसात काढणीच्या आलेल्या भाज्यांची तोडणी न करता आल्यामुळे नुकसान झाले. तसेच पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. मध्येच चार दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पावसातून शिल्लक राहिलेल्या भाज्यांची तोडणी सुरू झाली होती. मात्र, पुन्हा सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढणार नसल्याचे दरात वाढ राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाज्यांचे किलोचे दर

गवार : १२०शेवगा : १०० ते १२०मटार : १२० ते १६०दोडका : १०० ते १२०भेंडी : १०० ते १२०सिमला मिरची : १०० ते १२०

मेथीची जुडी ७० रुपये; सामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब

पावसाला सुरुवात झाली की, पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नाही. तसेच चांगल्या दर्जाच्या भाज्यांची आवक कमी झाल्याने परिणामी दरवाढ प्रचंड प्रमाणात होते. यामुळे गुरुवारी किरकोळ बाजारात मेथीच्या गड्डीची ६० ते ७० रुपयांनी विक्री करण्यात आली. आतापर्यंतचा हा उच्चांकी दर असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. तसेच कोथिंबीर, पालक, अंबाडी, कांदापात या पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. या भाज्यांच्या गड्डीचा दर ३० ते ४० रुपयापर्यंत गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्यादेखील गाबय झाल्या असल्याने सामान्यांनी जगावे तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfoodअन्नRainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यWomenमहिलाMONEYपैसा