पुणे : दौंड-काष्टी रेल्वेमार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे वाहतूक ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे काही प्रवासी गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर दौंडहून सुटणाऱ्या काही गाड्या दौंडऐवजी खडकी स्थानकावरच थांबविण्यात आल्या असून, त्या खडकीहून पुढील प्रवासासाठी सुरू केल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने या गाड्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
गाडी क्रमांक २२९४३ दौंड-इंदूर ही गाडी २४ आणि २५ जानेवारी रोजी दौंडऐवजी खडकी स्थानकावरूनच प्रवास सुरू करणार असून, खडकीहून दुपारी ३:४५ वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक २२१९३ दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस ही देखील दौंडऐवजी खडकीहूनच धावणार आहे.
ही गाडी दि. २५ रोजी नियोजित प्रवासासाठी, तर २६ रोजी मध्यरात्री १२:३५ वाजता खडकीहून सुटेल. या गाड्यांमध्ये आरक्षित तिकीट घेतलेल्या प्रवाशांनी आपल्या मूळ चढण्याच्या स्थानकात व सुटण्याच्या वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती तपासावी, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Web Summary : Due to Daund-Kashti doubling work, some trains originating from Daund will now start from Khadki station. The Indore and Gwalior Express trains are affected. Passengers should check the revised schedule to avoid inconvenience.
Web Summary : दौंड-काष्टी दोहरीकरण कार्य के कारण, दौंड से शुरू होने वाली कुछ ट्रेनें अब खडकी स्टेशन से चलेंगी। इंदौर और ग्वालियर एक्सप्रेस ट्रेनें प्रभावित हैं। यात्रियों को असुविधा से बचने के लिए संशोधित समय सारणी की जांच करनी चाहिए।