Pune Crime: कॉलवर लगट, घरी बोलावून पोलिसाचे मुलीशी अश्लील वर्तन, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 09:46 IST2023-10-12T09:45:50+5:302023-10-12T09:46:30+5:30

युवतीने याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती....

Indecent on call, policeman molested girl after calling home, case registered | Pune Crime: कॉलवर लगट, घरी बोलावून पोलिसाचे मुलीशी अश्लील वर्तन, गुन्हा दाखल

Pune Crime: कॉलवर लगट, घरी बोलावून पोलिसाचे मुलीशी अश्लील वर्तन, गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्माचाऱ्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक केशव इतरकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. युवतीने याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पोलिस नाईक इरतकर विश्रामबाग पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. इरतकरची युवतीशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मोबाइलवर युवतीबरोबर छायाचित्र काढले. युवतीचा मोबाइल क्रमांक घेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या मोबाइलवर संपर्क साधून त्याने तिला घरी बोलत अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

युवतीचा विनयभंग, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) इरतकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.

Web Title: Indecent on call, policeman molested girl after calling home, case registered