विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य: चार पीडितांसह सात साक्षीदार फितूर, तरीही कंत्राटी शिक्षकाला ३ वर्ष शिक्षा

By नम्रता फडणीस | Published: February 24, 2024 06:05 PM2024-02-24T18:05:32+5:302024-02-24T18:06:06+5:30

दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी आदेशात म्हटले आहे....

Indecent act with female students: Seven witnesses with four victims acquitted, yet contract teacher sentenced to 3 years | विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य: चार पीडितांसह सात साक्षीदार फितूर, तरीही कंत्राटी शिक्षकाला ३ वर्ष शिक्षा

विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य: चार पीडितांसह सात साक्षीदार फितूर, तरीही कंत्राटी शिक्षकाला ३ वर्ष शिक्षा

पुणे : शाळेत अश्लील कृत्य केल्याप्रकरणात पाच पैकी चार पीडित, मुख्याध्यापक फितूर झाले असतानाही न्यायालयाने कंत्राटी शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी आदेशात म्हटले आहे.

रामेश्वर विलास राठोड (वय ३५, रा. खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यापैकी चार पीडितांसह तब्बल ७ साक्षीदार फितूर झाले. डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत हडपसर भागातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली. राठोड शाळेत कंत्राटी शिक्षक होता. शाळेत अभ्यासक्रमासह नृत्य, हस्तकला, चित्रकला, खेळ शिकवण्यासाठी मुली येत असत. स्नेहसंमेलनासाठी डान्स शिकविण्याच्या बहाण्याने मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रण दाखविले.

याबाबत कोणाला सांगितल्यास घरी येऊन, त्या चित्रणाप्रमाणे अश्लील कृत्य करण्याची धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, ही बाब मुलींनी शिक्षकांना सांगितली. त्यांनी याबाबत ‘मुस्कान’ स्वयंसेवी संस्थेला कळविले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. ॲड. वाडेकर यांनी घेतलेला एक पीडित, तिचे पालक, एक विद्यार्थी, त्याचे पालक आणि दोन स्वयंसेवी आणि तपास अधिकाऱ्याची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. बचाव पक्षाने एक साक्षीदार तपासला. मात्र, तो खोटा ठरल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली.

Web Title: Indecent act with female students: Seven witnesses with four victims acquitted, yet contract teacher sentenced to 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.