अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याच्या निकटवर्तींयांच्या घरावर आयकरचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 05:03 PM2021-11-25T17:03:18+5:302021-11-25T17:03:31+5:30

आयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे

Income tax department raids businessman house in pune | अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याच्या निकटवर्तींयांच्या घरावर आयकरचा छापा

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याच्या निकटवर्तींयांच्या घरावर आयकरचा छापा

Next

पुणे : पुण्याच्या आंबेगाव मधील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घर आणि उद्योग - व्यवसायांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.

आयकर विभागाने आतापर्यंत शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर छापेमारी केली. आयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने आयटीची कारवाई सुरु असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.  

आयकर विभागाच्या एका पथकाने आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास मंचर इथल्यापराग डेअरीवर छापा टाकला. तर दुसऱ्या पथकाने अवसरी इथल्या पीर डेअरीवर पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. त्यानंतर तिसऱ्या पथकाने आज सकाळी सात वाजता थेट देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी छापा टाकला. तर चौथा छापा हा देवेंद्र शहा यांच्या मित्राच्या घरी सकाळी नऊ वाजता छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. आयटीकडून कार्यालयांची देखील झडती सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Income tax department raids businessman house in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app