शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय प्रयोगांचा प्रस्तावात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 04:35 IST

परदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या प्रयोगांचा स्मार्ट सिटीच्या प्रस्तावामध्ये समावेश करण्यात येणार आहे

पुणे : परदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या प्रयोगांचा स्मार्ट सिटीच्या प्रस्तावामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीच्या माध्यमातून ते प्रयोग पुणे शहरामध्ये केले जाणार आहेत.स्मार्ट सिटी योजनेसाठी देशभरातून १०० शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्राकडून डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील २० शहरांची निवड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा, म्हणून पुणे शहराकडून जोरदार तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातून स्मार्ट सिटीसाठी १० शहरांची निवड झाली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकाच शहराचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्या स्पर्धेत पुणे अग्रेसर आहे.महापालिकेने केंद्राकडे सादर करावयाच्या प्रस्तावासाठी मॅकेन्झी कंपनीची निवड केली आहे, प्रस्ताव सादर करण्यासाठी १०० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पहिल्या २० शहरांमध्ये निवड होण्यासाठी जोरदार स्पर्धा असल्याने पुणे महापालिकेकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रस्तावाची छाननी करून त्याचे मूल्यांकन करण्याचे तसेच पहिल्या २० शहरांची निवड करण्याचे काम एका समितीकडून केले जाणार आहे. या समितीमध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या योजनांचा प्रभाव पडेल यादृष्टीने प्रस्तावाची तयारी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.परदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेपरलेस कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या, दाखले आॅनलाइन पद्धतीने देता येतील का, याची जुळवाजुळव केली जात आहे. राज्याकडे प्रस्ताव सादर करताना आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांकरिता ‘स्मार्ट पुणं, माझं पुणं’ ही अभिनव स्पर्धा घेतली. त्यातून अनेक चांगल्या कल्पना पालिकेला मिळाल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यावरही विचार केला जात आहे.