पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल चोरीसह शेतकरी, वाहनचालकांच्या मोबाईल आणि विविध वस्तूंच्या चोऱ्यांनी बाजार घटक त्रस्त झाले आहे. आता तर एका गाळ्यावरील गल्ल्यावरच चोरांनी डाव साधत पंधरा हजारांची रक्कम लांबवल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर गूळ-भुसार आणि भाजीपाला बाजारात चोरीच्या घटना वाढल्याचे चित्र आहे.
मात्र बाजार घटकांतून निवडून गेलेल्या संचालकांनी बाजार घटकांना न्याय देणे अपेक्षित आहे. मात्र, संचालक याकडे लक्ष नसल्याचे चित्र बाजार घटकांच्या वाढत्या समस्या पाहता लक्षात येत आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागातील गाळा क्रमांक ११४, ११५ मे बबनराव अनंतराव पायगुडे यांच्या गाळ्यावर चोरी झाली. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या या चोरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, याबाबत गाळा मालक आडतदार सचिन पायगुडे म्हणाले, बाजारात वाराई, वाहन भाडे यासह इतर देणींसाठी काही रोख रक्कम ठेवावी लागते. त्यामुळे गाळ्यावर पंधरा हजार ठेवले होते. त्याची चोरी झाली. रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाकडे लेखी तक्रार देणार दिली आहे. चोऱ्यांमुळे शेतकरी, व्यापारी हैराण झाले आहेत. बाजार समिती कोट्यवधी रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करते. भाजीपाला बाजारात मेस्कोचे कर्मचारी दिसतात तरी भुसार बाजारात तर सुरक्षारक्षक दिसत नाहीत. तसचे चोऱ्यांसह दमदाटी करून पार्किंग शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळण्याचे बाजार आवारात प्रकार सर्रास सुरू आहेत. वाहनचालकांना दमदाटी करून वाहनांच्या बॅटरी, मोबाईल चोरीचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रकार जीवावर बेतण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सततच्या चोऱ्यांमुळे शेतकरी दहशतीखाली असल्याचे चित्र आहे. बाजार घटकांच्या तक्रारींवर बाजार समिती काहीच करत नसल्याचे चोऱ्यांवरून समोर येत आहे.
चोरींच्या घटना टाळण्यासाठी बाजारात गस्त वाढवण्याच्या सूचना सुरक्षा व्यवस्थेला दिल्या आहेत. मार्केट बंद असताना आडत्यांनी गाळ्यावर रोख रक्कम ठेवू नये. अनुचित प्रकार लक्षात आल्यास बाजार घटकांनी तत्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा. -डॉ. राजाराम धोंडकर सचिव, बाजार समिती, पुणे.
Web Summary : Thefts in Pune's Market Yard are escalating, targeting produce, mobiles, and cash. Farmers and traders are facing losses. Security measures are insufficient, leading to a climate of fear and demands for increased vigilance. Officials advise against keeping cash on-site.
Web Summary : पुणे के मार्केट यार्ड में चोरी की वारदातें बढ़ रही हैं, जिसमें उपज, मोबाइल और नकदी को निशाना बनाया जा रहा है। किसान और व्यापारी नुकसान का सामना कर रहे हैं। सुरक्षा उपाय अपर्याप्त हैं, जिससे भय का माहौल है और सतर्कता बढ़ाने की मांग की जा रही है। अधिकारियों ने परिसर में नकदी न रखने की सलाह दी है।