नारायणगाव येथे ‘राजासाब’ दालनाचे उद्घाटन

By Admin | Updated: May 9, 2017 03:22 IST2017-05-09T03:22:49+5:302017-05-09T03:22:49+5:30

नारायणगाव येथे भव्य शोरूम व विविध प्रकारच्या व्हरायटी असलेल्या प्रसिद्ध अशा ‘राजासाब’ या दालनाचे उद्घाटन

Inauguration of 'Rajasab' Gallery in Narayangaon | नारायणगाव येथे ‘राजासाब’ दालनाचे उद्घाटन

नारायणगाव येथे ‘राजासाब’ दालनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : नारायणगाव येथे भव्य शोरूम व विविध प्रकारच्या व्हरायटी असलेल्या प्रसिद्ध अशा ‘राजासाब’ या दालनाचे उद्घाटन प़ पू. आनंदघोष ऊर्फ मौनीबाबा यांच्या हस्ते करण्यात आले आहे, अशी माहिती ‘राजासाब’चे संचालक अशोक मुथ्था व शुभम मुथ्था यांनी दिली़
‘राजासाब’ची स्पेशल मेन्स वेअरचे दालन श्रीकृष्ण प्लाझा येथे सुरू झाले आहे़ भव्य अशा दालनामध्ये नवनवीन पॅटर्न्स, फॅन्सी व्हरायटी व पुणे, मुंबई या ठिकाणी मिळणाऱ्या नामांकित व विविध ब्रँडचे दर्जेदार स्पेशल मेन्स वेअर दालन ‘राजासाब’मध्ये उपलब्ध झाले आहे़ या शोरूमचे उद्घाटन प़ पू. ़आनंदघोष ऊर्फ मौनीबाबा यांच्या हस्ते झाले़
‘राजासाब’ची दुसरी शाखा शिंंदे मार्केट येथे कार्यरत आहे़ या वेळी लाला बँकेचे संचालक अशोक गांधी, विलासशेठ भळगट, राजूशेठ लोढा, देविचंद कटारिया, शशिकांत लोढा, निर्मल मुथ्था, वसंत खिवंसरा, महेश बोराणा, संतोष वाजगे, राजश्रीताई बोरकर, रोहिदास केदारी, शांतीलाल भंडारी, जवाहर गुगळे, ललित लुणावत आदींसह नारायणगाव शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते़
या वेळी मौनीबाबा लिखित स्वरूपात म्हणाले की, राजासाबमध्ये सर्वोत्तम सेवा व नवनवीन फॅशनचे कपडे उपलब्ध असल्याने पुरुषांच्या खरेदीसाठी हे दालन आकर्षण ठरेल व ग्राहकांच्या पसंतीस राहील, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या़

Web Title: Inauguration of 'Rajasab' Gallery in Narayangaon