वारजे येथील उड्डाणपुलाचे खासदार गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन : श्रेयवादाची लढाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 14:09 IST2019-06-15T14:03:07+5:302019-06-15T14:09:28+5:30

राष्ट्रवादी काँगेसकडून जिल्हयातील खासदारांच्या हस्ते उद्घाटनासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची कुणकुण भारतीय जनता पार्टीच्या गोटात लागली.

The inauguration of Flyover by MP Girish Bapat at Warje | वारजे येथील उड्डाणपुलाचे खासदार गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन : श्रेयवादाची लढाई 

वारजे येथील उड्डाणपुलाचे खासदार गिरीश बापटांच्या हस्ते उद्घाटन : श्रेयवादाची लढाई 

पुणे : राष्ट्रवादी काँगेसकडून जिल्हयातील खासदारांच्या हस्ते उद्घाटनासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची कुणकुण भारतीय जनता पार्टीच्या गोटात लागली. आणि भाजपाकडून उद्घाटनाचा जास्त गाजावाजा न करता काही करून फक्त उद्घाटनाचे श्रेय पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने पॉप्युलरनगर चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. 
भाजपाच्या काळात सुरु झालेला पॉप्युलरनगर हायवे चौकातील पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आला.यावेळी आमदार भीमराव तापकीर , मेधा कुलकर्णी शहर.सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर बीडीपी अध्यक्ष किरण दगडे , नगरसेविका वृषाली चौधरी ,माजी नगरसेवक किरण बारटक्के स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट , दत्तात्रय चौधरी उपस्थित होते. 
राष्ट्रवादीची धडपड ओळखून खासदार बापट यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ स्थानिक कार्यकर्त्यांना उद्घाटनाची तयारी करण्याची सूचना केल्यामुळे खडकवासला मतदारसंघाचे भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. 

Web Title: The inauguration of Flyover by MP Girish Bapat at Warje