Pune | वडकीमध्ये शेतात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:10 IST2023-04-01T16:09:46+5:302023-04-01T16:10:10+5:30

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल...

In Vadki an unknown youth was killed and his body was dumped in the field | Pune | वडकीमध्ये शेतात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Pune | वडकीमध्ये शेतात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

लोणी काळभोर (पुणे) : वडकी (ता. हवेली) येथील शेतात एका अनोळखी तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.३०) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडकी येथील एका हॉटेल व्यावसायिकाचे टाकमाळ परिसरात शेत आहे. त्यांना हॉटेलसाठी नेहमी लाकडे लागत असतात. त्यामुळे त्यांनी कामगारांना शेतातून लाकडे तोडून आणण्यास सांगितले होते. त्यानंतर कामगार शेतात गेले, तेव्हा त्यांना गट नं. ६११ मधील शेतात अनोळखी इसमाचा मृतदेह पडलेला दिसून आला. तसेच तो मृतदेह संपूर्ण सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडलेले दिसून आले. या घटनेची माहिती कामगारांनी तातडीने लोणी काळभोर पोलिसांना दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. दरम्यान, मृतदेहाच्या मानेवरील जखमेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या अनोळखी मृतदेहाचे वय अंदाजे ३५ ते ४० आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: In Vadki an unknown youth was killed and his body was dumped in the field