पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाला भरदिवसा संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 16:49 IST2022-09-25T16:49:40+5:302022-09-25T16:49:58+5:30
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाला भरदिवसा संपवले
धायरी : मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाचा डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून खून करण्यात आला आहे. नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (वय १७, रा. जाधव नगर , वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागेश हा वडगाव बुद्रुक येथील पाऊंजाई मंदिर पाठीमागील घुले नगर परिसरात असणाऱ्या मोकळ्या प्लॉटमध्ये एका मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घातली. यात तो गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.