Video: पुण्यात संतोष मानेची पुनरावृत्ती; मद्यधुंद बसचालकाचा प्रवाशांचा जीवाशी खेळ; विरुद्ध दिशेने बस चालवत वाहनाला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 14:20 IST2023-10-22T13:08:11+5:302023-10-22T14:20:49+5:30
अपघातात काही नागरिक व प्रवाशांना दुखापत झाली आहे

Video: पुण्यात संतोष मानेची पुनरावृत्ती; मद्यधुंद बसचालकाचा प्रवाशांचा जीवाशी खेळ; विरुद्ध दिशेने बस चालवत वाहनाला धडक
पुणे: पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर मद्यधुंद बसचालकाचा जीवघेणा प्रकार समोर आला आहे. चालकाने अत्यंत वर्दळीच्या भागात प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. निलेश सावंत असे या बसचालकाचे नाव आहे. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे.
पुण्यात मद्यधुंद बसचालकाचा प्रवाशांचा जीवाशी खेळ; विरुद्ध दिशेने बस चालवत वाहनांना धडक#Pune#pmpmlpic.twitter.com/8cxePVHU2c
— Lokmat (@lokmat) October 22, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ चौकात हि धक्कादायक घटना घडली आहे. निलेश सावंत या रस्त्यावर विरुद्ध दिशेने बस चालवत असल्याचे दिसून आले आहे. त्याठिकाणी आजूबाजूचे नागरिक आरडाओरडा करताना दिसत आहेत. तर प्रवाशांनीही जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु केल्याचे दिसून आले आहे. सावंत हा मद्यधुंद अवस्थेत असून तो प्रवासी, रस्त्यावरील वाहने, आणि नागरिक यांचा कुठलाही विचार न करता बस चालवताना दिसून आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून तो बस जोरात मागे घेत कारला धडकल्याचे दिसत आहे. त्यावेळी नागरिक आणि प्रवासी आरडाओरड करत आहेत. या अपघातामध्ये काही प्रवाशी आणि वाहनचालकांना दुखापत झाली आहे. जखमींचा नेमका आकडा समजलेला नाही. जीवितहानी झाली नसून पोलिसांकडून आता चालक निलेश सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला असून तपासाला सुरुवात झाला आहे.