विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:47 PM2021-07-27T19:47:10+5:302021-07-27T19:51:45+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही 23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत जाहिर करण्यात आले होते

Important news for students! Changes to the fifth and eighth scholarship examinations | विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बदल

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बदल

googlenewsNext
ठळक मुद्देपरीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलैला संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्धबदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही २३ मे २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन या परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली होती. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही ८ ऑगस्ट २०२१ घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु त्यादिवशी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही परिक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्ट २०२१ ला घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलैला संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी केले आहे. 

Web Title: Important news for students! Changes to the fifth and eighth scholarship examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.