शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच

By admin | Updated: August 18, 2014 05:17 IST

पुरूषप्रधान संस्कृतीत घरचा गाढा ओढणार्‍या महिलांवर आजही कुटुंब नियोजनाचा भार टाकला जात आहे.

पुणे : पुरूषप्रधान संस्कृतीत घरचा गाढा ओढणार्‍या महिलांवर आजही कुटुंब नियोजनाचा भार टाकला जात आहे. सुशिक्षीत समाज आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यामुळे महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा पुरूषावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे सोपे असतानाही त्यासाठी पुरूष पुढे येत नसल्याचे कुटुंब कल्याण विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजही या शस्त्रक्रिया महिलांनाच कराव्या लागत आहेत. गेल्या ६ वर्षात पुरूष नसबंदीच्या प्रमाणात सातत्याने घट झाली आहे. विशेष म्हणजे, पुरूषांनी नसबंदीसाठी पुढे यावे यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या, जास्त पैसे देऊ केले तरी त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे.२00८-0९ या काळात राज्य कुटुंब कल्याण विभागाने केलेल्या एकूण कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये ७ टक्के शस्त्रक्रिया या पुरूषांवर करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर या प्रमाणात सातत्याने घट झाल्याचे दिसून येत आहे.सन २00९-१0 या वर्षात हे प्रमाण घटून ६.४ टक्क्यांवर आले. २0१0-११ या वर्षात हे प्रमाण ५.६ टक्के, २0११-१२ या वर्षात हे प्रमाण ४.१ टक्के, २0१२-१३ या वर्षात हे प्रमाण ३.७ टक्के आणि २0१३-१४ या वर्षात हे प्रमाण आणखी घटून ३.४ टक्क्यांपर्यंत खाली आले. या तुलनेत महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण या ६ वर्षात नेहमी ८0 टक्क्यांहून अधिक राहिले आहे. (प्रतिनिधी)