सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरल्याने सुनेचा गळा आवळून खून, खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:17 IST2023-05-31T16:17:12+5:302023-05-31T16:17:52+5:30
दुर्दैवी गोष्ट म्हणजे सुनेचा सुनेचा गळा आवळताना ७ वर्षीय मुलीने समक्ष पाहिले

सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरल्याने सुनेचा गळा आवळून खून, खेड तालुक्यातील घटना
राजगुरुनगर: अनैतिक संबंधाला सुन अडसर ठरत असल्यामुळे सासऱ्याने सुनेची गळा आवळून खून केल्याची घटना वाफगाव (ता खेड ) येथे घडली आहे. मेघा रंगनाथ कोळी ( वय ३४ रा.वाफगाव कुरणेवस्ती ता.खेड ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सासरा दिनकर मल्हारी कोळी याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना वाफगाव परिसरातील कुरणे वस्ती येथे दि २९ रोजी घडली. दोन दिवसानंतर खुनाची घटना उजेडात आली. या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासरा दिनकर मल्हारी कोळी यांचे वाफगाव परिसरातील जऊळके बुद्रुक येथील एका महिलेची अनैतिक संबध होते. त्यास सुन मेघा कोळी ही विरोध करत होती. या कारणावरुन दिनकर कोळी याने सुन मेघा कोळी हिचा कुरणेवस्ती वाफगाव येथे राहत्या घरी कोणीही नसल्याचे पाहून हाताने गळा आवळून व तोंड दाबून खून केला. मेघा हिचा गळा आवळताना तिची सात वर्षीय मुलीने समक्ष पाहीले. खेड पोलिसांनी दिनकर कोळी याला अटक केली असून सुनेच्या खुनाची कबुली दिली आहे.