शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ धावून जाणारे ‘बीट मार्शल’

By admin | Updated: July 12, 2015 01:40 IST

कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी काही मिनिटांच्या कालावधीत घटनास्थळावर

- मंगेश पांडे,  पिंपरी कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी काही मिनिटांच्या कालावधीत घटनास्थळावर पोहोचणारे गस्तीवरील पोलीस ‘बीट मार्शल’ महत्त्वाची भूमिका बजावतात. शहरातील आठही पोलीस ठाण्यांमध्ये चोवीस तास बीट मार्शल तैनात आहेत. आता तर पुरुष बीट मार्शलसह महिला बीट मार्शलही गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला विनागिअरच्या दुचाकी दिल्या आहेत.दोन गटांतील वाद, दंगल, अपघातानंतर संतप्त झालेला जमाव, किरकोळ कारणावरून झालेले वाद असे प्रसंग वारंवार घडत असतात. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होेते. अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता असते. अथवा गुन्हा घडल्यास पोलिसांची मदत मिळविण्यासाठी प्रत्येकालाच पोलीस ठाणे अथवा चौकी माहीत नसते. पीडित गोंधळलेल्या स्थितीत असतात. अशा वेळी १०० नंबरवरून पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यास ‘बीट मार्शल’ महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पुरुष बीट मार्शल आहेत. आता महिला बीट मार्शलही मदतीसाठी हजर राहणार आहेत. याचा अधिकाधिक फायदा महिला पीडितांना होऊ शकतो. सध्या परिमंडळ तीनमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात चौकीनिहाय बीट मार्शल नेमले आहेत. चौकीअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात त्यांची गस्त सुरू असते. एका दुचाकीवर दोन कर्मचारी असतात. त्यापैकी एकाकडे शस्त्र आणि वॉकीटॉकी असते. तर, एक जण दुचाकी चालवितो. यामध्ये बँका, शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, एटीएम, धार्मिक स्थळे आदी महत्त्वाच्या ठिकाणी मार्शलचे अधिक लक्ष असते. एखादी व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळल्यास त्याच्याकडील ओळखपत्र तपासणे, राहायला कुठे आहे, कामाला कुठे आहे आदी चौकशी केली जाते. काही गंभीर प्रकार आढळल्यास इतर सहकाऱ्यांच्या मदतीने प्रकरण हाताळले जाते. शंभर नंबरवर कॉलएखादी व्यक्ती अडचणीत असली अथवा तातडीने मदत हवी असल्यास मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला १०० नंबरवर कळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. कॉल केल्यानंतर पीडित व्यक्तीला ठिकाण विचारले जाते. हा संदेश वॉकीटॉकीवर टाकला जातो. काही सेकंदांतच हा संदेश बीट मार्शलपर्यंत पोहोचतो. नियंत्रण कक्षाकडून पीडित व्यक्तीचा संपर्क क्रमांकही वॉकीटॉकीवर दिला जातो. मार्शलला ठिकाण शोधण्यास काही अडचण निर्माण झाल्यास पीडित व्यक्तीशी संपर्क साधून त्या ठिकाणी मार्शल पोहोचतात.विविध प्रकारचे २५ कॉलबीट मार्शलकडे असलेल्या वॉकीटॉकीवर संदेश येत असतात. शहरातील विविध भागांतील घटनांची त्यावर माहिती दिली जाते. यामध्ये आपल्या हद्दीतील काही घटना आहे का, याकडे मार्शलचे बारकाईने लक्ष असते. प्रत्येक मार्शलला त्यांच्या हद्दीतील दिवसभरात सुमारे २५ कॉल असतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचा तपशील घेऊन पुन्हा तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले जाते. तसेच, पीडित व्यक्तीला मदत करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले जाते. त्यानंतर ठाण्यात हजर करून रितसर तक्रार नोंदविली जाते. महिलांसाठी विनागिअरच्या गाड्याशहरात आता पुरुष बीट मार्शलसह महिला बीट मार्शलही गस्त घालताना दिसतील. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून दोन आठवड्यांपूर्वीच प्रत्येक पोलीस ठाण्याला विनागिअरच्या दुचाकी दिल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ तीनमधील ठाण्यांनाही दुचाकी मिळणार आहेत. यासाठी ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. महिला मार्शलकडे पिस्तूल देण्यात येणार असून, विशेषत: त्याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. महिला बीट मार्शलमुळे महिलांचे प्रश्न तातडीने सोडविण्यास मदत होणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप ठाण्यांना दुचाकी प्राप्त झाल्या नसून, त्या लवकरच मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ८ ते १० मिनिटांत घटनास्थळीपरिमंडळ तीनमध्ये बीट मार्शलचे मोठे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळाल्यास ८ ते १० मिनिटांतच मार्शल त्या ठिकाणी पोहोचतात. दूर अंतर अथवा वाहतूककोंडी असल्यास एखाद्या वेळेला थोडा अधिक वेळ लागतो.