मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:50 IST2025-03-01T17:48:38+5:302025-03-01T17:50:46+5:30
राजकीय वरदहस्त कुणाचं हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का?

मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर दुसरीकडे देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रानुसार वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. तर कराड याच्याविरोधात पुरावे मिळाल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिले आहे, यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच खासदार बजरंग सोनवणे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केले आहे.
सोनवणे म्हणाले, आज महाराष्ट्रासमोर गुन्हेगारीचा चेहरा समोर आलाय. एक नंबर चा आरोपी गुंडांचा राजा किंवा गुंडांचा प्रमुख म्हणता येईल. त्याच्या खाली 11 त्यांची 11 माणसे आहे. या सगळ्यांची जिल्ह्यात सुमारे 100 जणांची टोळी आहे. या टोळीला राजकीय वरदहस्त आहे. त्याला परिणाम भोगावे लागतील. राजकीय वरदहस्त कुणाचं हे सगळ्यांना माहिती आहे. मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही. पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. या प्रकरणात ED सुद्धा आली पाहिजे. हे प्रकरण इथेच थांबत नाही. अजून शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे. महाजन आणि पाटील या दोन पोलिस अधिकाऱ्यांना सह आरोपी केले पाहिजे. आरोपींना मदत करणाऱ्यांना, फरार आरोपींना अटक झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.
आरोपीला तुरुंगात VIP ट्रीटमेंट
ज्या व्यक्तीने नागपूर अधिवेशन सुरू असताना बाहेरून बाईट दिला होता आणि सांगितले होते की, वाल्मीक कराड माझा माणूस आहे. योग्य तपास झाला तर त्या माणसापर्यंत पोहोचता येईल. पोलिस यंत्रणेच आज कौतुक केलं पाहिजे. परंतु पुढे गुन्हे सिद्ध कसे होतील याची खबरदारी घेतली पाहिजे. आरोपीला तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली. उज्वल निकम यांच्याबरोबर फिर्यादीच्या वतीने सतीश माने शिंदे यांच्या मार्फत ही खटला चालवणार आहोत. त्यांनी होकार दिला आहे. ते कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार आहेत. शेवटच्या माणसाला शिक्षा होईपर्यंत, फाशी होई पर्यंत माघार घेणार नाही. मी अमित शाह यांना पुन्हा भेटणार आहे. याआधी सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेटलो. धस आणि मुंडे भेटीवर धस बोलले आहे. या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने होईल अशी अपेक्षा आहे.