शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

फ्रुट पल्प पॅकिंगच्या नावाखाली अवैध पद्धतीने दारूची वाहतूक; तब्बल १ कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:25 IST

गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गुजरात व इतर ठिकाणी पाठवण्यासाठी पॅकिंग केल्याचे आढळून आले

पुणे : वीटभट्टीसाठी लागणाऱ्या काेळशाच्या पावडरच्या आडून व फ्रुट पल्पच्या पॅकिंगच्या नावाखाली अवैध गाेवा बनावटीचे मद्य घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यावेळी १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी एक्साईज विभागाने विदेशी मद्याच्या १ हजार ६६८ बाटल्या व पाच वाहने जप्त केली.

संशयित वाहनांची तपासणी करत असताना, गोवा बनावटी मद्याचे ३ बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाले. त्याच्याकडे चौकशीतून नसरापूर येथील एका पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला असता, तेथे एक जण ट्रकमधून गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गाडीतून उतरून गोडाऊन मध्ये ठेवत होता. त्याला ताब्यात घेऊन शेडची तपासणी केली असता, ट्रकमध्ये वीटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळशाची पावडर व गोवा बनावटीचे विविध ब्रांडच्या विदेशी मद्याचे बॉक्स, तसेच पत्र्याच्या शेडमध्ये थर्माकोलच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीचे मद्य मिळून आले. हे मद्य थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून फ्रुट पल्पच्या नावाखाली गुजरात व इतरत्र पाठवण्यासाठी पॅकिंग केले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून सहाचाकी ट्रक, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १ हजार ७१० बाटल्या व इतर मुद्देमाल, असा ५१ लाख ९५ हजार १७० रुपयांचा माल जप्त करून चौघांना अटक केली आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक पी. एम. मोहिते, एस. सी. शिंदे, संदीप मांडवेकर, जवान सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, ऋतिक कोळपे, बाळू आढाव यांच्या पथकाने केली आहे.

दुसरी कारवाई निगडी येथील पवळे पुलाखाली भक्ती-शक्ती चौक येथे करण्यात आली. गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य व बिअर, असा एकूण १ लाख ३४ हजार २३० रुपयांचा मद्यसाठा एका खासगी कंपनीच्या लक्झरी बसमधून आणला जात होता. बस चालकाला ताब्यात घेऊन हा साठा जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा खडकी औंध रोडवरील खडकी स्टेशनजवळ वितरीत करण्यात येणार होता. यावेळी ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यासोबतच २ दुचाकी वाहने व एक सहाचाकी बस जप्त करण्यात आली. या ठिकाणी विदेशी दारूच्या १२६ बाटल्या, बिअरच्या २४ बाटल्या, असा एकूण ६८ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सांगर धोमकर, उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांत मिळून एकूण १ कोटी २० लाख ३२ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीMONEYपैसाPoliceपोलिसgoaगोवाGujaratगुजरात