'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल', असे घाबरवून १७ वर्षीय मुलीला प्रेम करण्यास भाग पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:32 IST2021-07-21T19:31:59+5:302021-07-21T19:32:23+5:30

मुलीचा छळ करून विनयभंग करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

'If you don't love me, I'll die under the train', forcing 17-year-old girl to fall in love | 'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल', असे घाबरवून १७ वर्षीय मुलीला प्रेम करण्यास भाग पाडले

'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल', असे घाबरवून १७ वर्षीय मुलीला प्रेम करण्यास भाग पाडले

ठळक मुद्देमुलीच्या वडिलांनी कुटुंबियांच्या जीवास धोका असल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली

लोणी काळभोर : 'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल' असे घाबरवत मुलीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुष्कर कोतवाल ( वय २०, रा. कुंजीरवाडी ता.हवेली ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुलगी आणि तरुण एकाच हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होते. तो तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देत असे. तिच्याकडे सतत बघणे, दुस-यामार्फत तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करत असे. परंतु मुलगी त्याकडे दुर्लक्ष करत होती.

२०१८ मध्ये ती बडमिंटन खेळण्यासाठी गेल्यावर पुष्करने तिचा पाठलाग करुन तिच्या सोबत प्रेम करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी ती घाबरुन निघून चालली होती. त्याच क्षणी टोकदार वस्तूने डाव्या हातावर कापून घेत 'तू जर माझ्यावर प्रेम नाही केले, तर मी रेल्वे अथवा ट्रकखाली जाऊन आत्महत्या करेल'. असे म्हणत तिला भेटण्यास व बोलण्यास भाग पाडले होते. तसेच तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याने तिच्यासोबत फोटो काढले. तिच्या इन्स्टाग्राम व स्नॅपचॅट सोशल मिडीयाचा पासवर्ड बळजबरीने मागून घेतला. मुलीला एकांतात भेटण्यास बोलावून विनयभंग केला. 
          
यासंदर्भात मार्च २०२१ मध्ये तिने कुटुंबियांना विश्वासात घेऊन पुष्करबद्दल सर्व घरी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पुष्करच्या घरी जाऊन त्याच्या  कुटुंबियांना झालेल्या प्रकाराबाबत सांगितले होते. त्यानंतरही तो आय मिस यु अशा प्रकारचे वारंवार ई-मेल पाठवुन त्रास दिला. १० जुलैला मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत पुणे-  सोलापुर महामार्गावरील कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील आईसक्रिम पार्लर येथे गेली असता तेथेही तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती आणि कुटुंबीय सर्वजण घाबरून गेले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी कुटुंबियांच्या जीवास धोका असल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

Web Title: 'If you don't love me, I'll die under the train', forcing 17-year-old girl to fall in love