'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:14 IST2025-09-21T13:09:39+5:302025-09-21T13:14:14+5:30
Ajit pawar: अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील काही भागांचा दौरा केला. महिला सुरक्षा आणि वाढत्या गुन्हेगारीवरून त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इशारा दिला.

'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
'महिला, मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. तुम्ही इथे येऊन नोकरी व्यवसाय करा. नियमात असेल, ते करण्याला आमचा विरोध नाही. पण, आम्ही कुणाचीही गुंडगिरी, दहशत खपवून घेणार नाही. मकोका लावला जाईल', असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताना दिला.
नागरिकांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "गोरगरिबांच्या मुलांना, मुलींना रोजगार मिळावा म्हणून अलिकडच्या काळात जे ज्ञान मिळायला हवं. पूर्वी आयटी, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याला महत्त्व होतं. आता एआय ला महत्त्व देतात. त्याने सगळं जग व्यापलेलं आहे. आपल्याही त्या रस्त्याने जावं लागणार आहे", असे अजित पवार म्हणाले.
वेळ आली तर मकोकाही लावणार
अजित पवार यावेळी म्हणाले, "महिलांना, मुलींना, मातांना सुरक्षित वाटलं पाहिजे. आम्ही कुणाची गुंडगिरी, गुन्हेगारी, दहशत ही खपवून घेणार नाही. वेळ आली तर त्यांच्यावर मकोका लावायला देखील आम्ही पोलिसांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही या शहरात रहा. आनंदाने व्यवसाय करा. नोकरी करा."
"तुमच्या मनामध्ये काही असेल, ते शहराच्या फायद्याचे असेल, सरकारने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये बसणार असेल, तर ते करायला आमची हरकत नाही. पण, ते करत असताना तुम्ही कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात आम्ही ऐकणार नाही", असा इशारा अजित पवारांनी गुंडगिरी, दहशत निर्माण करणाऱ्यांना दिला.
...अन् अजित पवारांनाही हसू अनावर
यावेळी अजित पवारांनी वेगवेगळ्या मागण्यांची निवेदन दिली होती. त्यातील एक निवेदन हे मोकाट कुत्र्यांसदर्भातील होते.
अजित पवार म्हणाले, 'मनपाच्या जागेमध्ये अनधिकृतपणे जो काही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे. सांस्कृतिक भवनाजवळ. त्याचे मला फोटो दाखवण्यात आले. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आता ती कुत्री बाहेर काढलेली आहेत. ती पकडून बाहेर कशी न्यायची, तीही व्यवस्था करू. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही आणि नियमांचाही भंग होणार नाही, अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत", अशी माहिती पवारांनी दिली.