हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:50 IST2026-01-27T12:47:29+5:302026-01-27T12:50:22+5:30

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दीप्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेल्या असताना कुटुंबातील महिला चाकणकर यांच्यावर संतापल्याचे दिसून आले आहे.

If the law had been changed after the hagavane case Deepti would have been saved Women Commission angry in pune | हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप

हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप

पुणे: उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पती, सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती मगर चौधरी असे विवाहितेची नाव आहे. याप्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर यांनी तक्रार दिली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे. तर सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी दीप्तीच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारले आहेत. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दीप्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिच्या कुटुंबातील महिला रुपाली चाकणकर यांच्यावर संतापल्याचे दिसून आले. वैष्णवी हगवणे प्रकरण झालं. त्यानंतर तुम्ही कायद्यात काही बदल केले का? असा सवाल महिलांनी उपस्थित केला. त्यानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती असं म्हणत त्यांनी आयोगावर संताप व्यक्त केला आहे. आमच्या मुली स्वस्त झाल्या आहेत का? याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे ना? असं म्हणत महिलांनी चाकणकर यांच्यासमोर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. यावेळी चाकणकर यांनी दीप्तीचे आई वडील यांच्याशीही संवादही साधला.  

फिर्यादी यांची मुलगी दिप्ती चौधरीचा विवाह रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता. लग्नामध्ये ५० तोळे सोने देण्यात आले होते. विवाहानंतर दि. 25 डिसेंबर 2019 पासून 24 जानेवारी 2026 दरम्यान दिप्ती हिस हिला चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करण्यात येत होती. तसेच एक महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला, तिच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे घेतले जात होते. तसेच तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दिप्ती हिस हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आत्महत्येस पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित कारभारी चौधरी (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे कारणीभूत असल्याचा आरोप आहे. आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या भाजप पक्षाकडून झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. 

Web Title : दहेज हत्या से आक्रोश; महिलाओं ने हगवाने मामले के बाद निष्क्रियता पर सवाल उठाए।

Web Summary : पुणे: दहेज उत्पीड़न से तंग आकर दीप्ति मगर चौधरी नामक एक महिला ने आत्महत्या कर ली। परिवार ने वैष्णवी हगवाने मामले के बाद निष्क्रियता का आरोप लगाया। पति, ससुराल वाले गिरफ्तार; सास भाजपा सरपंच हैं। महिला आयोग ने विरोध के बीच परिवार से मुलाकात की।

Web Title : Dowry death sparks outrage; women question inaction after Hagawane case.

Web Summary : Pune: A woman, Deepti Magar Choudhary, died by suicide due to alleged dowry harassment. Family blames inaction after the Vaishnavi Hagawane case. Husband, in-laws booked; the mother-in-law is a BJP Sarpanch. Women's Commission met the family amid protests.