शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

"ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू.."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 4:47 PM

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागणे चुकीचे आहे.

ठळक मुद्देओबीसी संघर्ष सेनेची गुरूवारी पत्रकार परिषद

पुणे : ओबीसी समाजासाठी असलेल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावरून उतरून आंदोलन करेल असा इशारा ओबीसी संघर्ष सेनेने दिला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच केंद्र सरकारच्या आर्थिक मागासांच्या आरक्षत उपगट करून त्यामध्ये मराठा समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव, यवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, रामदास सुर्यवंशी, आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. हाके म्हणाले, ‘मराठा समाजाला ओबीसी मधून पाच टक्के आरक्षण द्यावे, अशी भूमिका मराठा नेत्यांकडून मांडली जाऊ लागली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही ओबीसींनी मन मोठे करावे, असे म्हटले आहे. कोल्हे यांनी आधी गावगाड्याचा अभ्यास करून बोलावे. ओबीसींच्या आरक्षणाला आम्हा धक्का लावू देणार नाही.’ ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या पध्दतीने मागासवर्गीय आयोग नेमला. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या मागदर्शक तत्वांनुसार काम केले नाही. आयोगाच्या बोगस अहवालावर मराठा समाजाला दिलेले आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपणही नाकारले आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागणे त्यांच्या प्रतिमेला शोभणारे नाही. आरक्षण गरीबी हटविण्यासाठी नसून शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दुर करण्यासाठी आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षणाची भुमिका घेतल्यास राज्यातील ५२ टक्के ओबीसी मतदानावर बहिष्कार टाकतील. रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल,’ असे हाके यांनी स्पष्ट केले.----------------आताचे छत्रपती घेणारेछत्रपती शिवाजी महाराज जनतेला देणारे होते. आताचे छत्रपती आमच्याकडूनच घेत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागणे चुकीचे आहे. आरक्षणासंदर्भात काहींचा संयम सुटत चालला आहे. ओबीसींबद्दल चुकीची भाषा वापरली जात आहे, असे प्रताप गुरव यांनी नमुद केले.--------------

टॅग्स :PuneपुणेOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन