हीच घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं: रूपाली चाकणकरांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:16 IST2021-05-11T15:12:18+5:302021-05-11T15:16:52+5:30
बिहारमध्ये काल गंगा नदीत १०० पेक्षा जास्त प्रेतं तरंगताना आढळली..रुपाली चाकणकरांचं भाजपवर शरसंधान....

हीच घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं: रूपाली चाकणकरांची घणाघाती टीका
पुणे(धायरी) : बिहारमध्ये काल गंगा नदीत १०० पेक्षा जास्त प्रेतं तरंगताना आढळली. हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं. तसेच दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.
तसेच हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती. मृत्यूचं भांडवल करणं त्यांनाच जमतं. असा उपरोधिक टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे.
काय आहे प्रकरण...
बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची चक्क नद्यांमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोना ग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटिहार येथेही कटीहार नदीत काही मृतदेह आढळलेले आहेत.याबाबत स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगताना आढळले. येथील घाटावर रोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.