शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भांडगावला मंदिरातून मूर्ती चोरी

By admin | Updated: February 22, 2015 22:53 IST

भांडगाव (ता. दौंड) येथील कारंडे पिंगळेवस्तीमधील बिरोबादेवाच्या मंदिरातून चांदीच्या देवाच्या तीन मूर्ती, चांदीचे मुखवटे, सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केली आहे.

यवत : भांडगाव (ता. दौंड) येथील कारंडे पिंगळेवस्तीमधील बिरोबादेवाच्या मंदिरातून चांदीच्या देवाच्या तीन मूर्ती, चांदीचे मुखवटे, सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केली आहे. ही घटना काल (दि. २१) रात्री साडेअकरा ते आज (दि. २२) सकाळी सात वाजण्याच्यादरम्यान घडली.बिरोबा मंदिरातून एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबतची फिर्याद मंदिरातील पुजारी भिवा मारुती कारंडे यांनी यवत पोलिसात दिली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार : मंदिरातील तीन चांदीच्या मूर्ती यात एक विठोबादेवाची, दुसरी बिरोबादेवाची व तिसरी शिंगोदेवाची अशी प्रत्येकी ४१६ ग्रॅम वजनाची असे एकूण १२४८ ग्रॅम चांदीच्या मूर्ती एकंदरीत किंमत १५ हजार रुपये, दोन सोन्याचे लॉकेट प्रत्येकी अडीच ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत ६ हजार रुपये, देवाचे पाच चांदीचे मुखवटे ५० ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत ५ हजार रुपये व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे. मंदिराचे ग्रील शटरचे कुलूप तोडून चोरांनी मंदिरात प्रवेश केला व वरील ऐवज चोरी केल्याचे दिसून येत आहे. सकाळी परिसरातील नागरिक मंदिराकडे गेले असता त्यांना चोरी झाल्याचे निदशर्नास आले. या वेळी मंदिरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली यवत पोलीस करीत आहेत.