'हिंदीतच बोलणार...' वाघोलीतील डी मार्टमध्ये मुजोरी, मराठीत बोलायला नकार; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:26 IST2025-03-15T12:25:05+5:302025-03-15T12:26:38+5:30
महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना अजिबात दया माया दाखवू नका

'हिंदीतच बोलणार...' वाघोलीतील डी मार्टमध्ये मुजोरी, मराठीत बोलायला नकार; व्हिडिओ व्हायरल
पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसतोय. मराठी भाषेला आणि मराठी भाषकांना हक्काच्या महाराष्ट्रातच वाईट वागणूक दिली जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. नुकताच यातील एक प्रकार मुंबईतील एअरटेल कंपनीच्या सर्व्हिस सेंटर गॅलरीमध्ये घडला होता तर आता पुण्यातील मराठी विरूद्ध अमराठी असा वादाचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पुण्यातील वाघोली डी मार्ट येथील असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओत एक माणूस मराठी बोलण्यास सांगत आहे. डी मार्टमध्ये उपस्थित असलेला दुसरा माणूस त्याला हिंदी भाषेतच बोलणार मराठी बोलणार नाही असे सांगत आहे. त्यासोबत दोघात शाब्दिक वार होतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर काही युजर्सनी महाराष्ट्रात मराठी बोलायला हवी म्हणून व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला पाठींबा दिला आहे तर काही युजर्सने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सदर व्हिडिओ पुण्यातील वाघोलीच्या डी- मार्ट मधील आहे
— आनंद (@mum_anand) March 12, 2025
महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना अजिबात दया माया दाखवू नका. हे भिकारचोट हरामखोर महाराष्ट्रात येऊन आपल्याशी कितीही तोंडावर गोड बोलले तरी पाठीमागून हे ह्यांची लायकी दाखवतात.
मराठी माणसा आता तरी जागा हो.. pic.twitter.com/f2yigIMcti
हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने लिहिले आहे ,'महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना अजिबात दया माया दाखवू नका. हे xxx महाराष्ट्रात येऊन आपल्याशी कितीही तोंडावर गोड बोलले तरी पाठीमागून हे ह्यांची लायकी दाखवतात. मराठी माणसा आता तरी जागा हो..' असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
तत्पूर्वी, नुकताच एक प्रकार एअरटेल कंपनीच्या सर्व्हिस सेंटर गॅलरीमध्ये घडला. 'क्यू मराठी आना चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत भाजपाच्या आमदार चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी थेट वॉर्निंग दिली होती.