‘तुझं आयुष्य उध्वस्त करेन’ पोलीस निरीक्षकावर आरोप करत हवालदार बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:33 IST2025-06-11T11:32:33+5:302025-06-11T11:33:14+5:30

इंदापूर पोलिस ठाण्यात दिली असून पतीला न्याय न मिळाल्यास मुलांसह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही पत्नीने दिली आहे

I will ruin your job and your life; Police inspector threatens; Constable goes missing | ‘तुझं आयुष्य उध्वस्त करेन’ पोलीस निरीक्षकावर आरोप करत हवालदार बेपत्ता

‘तुझं आयुष्य उध्वस्त करेन’ पोलीस निरीक्षकावर आरोप करत हवालदार बेपत्ता

इंदापूर : पोलिस निरीक्षकांने जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिस हवलदार बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित हवलदाराच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात दिली असून पतीला न्याय न मिळाल्यास मुलांसह पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही पत्नीने दिली आहे.

विष्णू सुभाष केमदारणे (वय ३९, सध्या रा. इंदापूर पोलिस ठाणे वसाहत, मूळ रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे बेपत्ता झालेल्या हवालदारांचे नाव आहे. त्यांची पत्नी प्रियंका केमदारणे यांनी ते

बेपत्ता झाल्याची खबर पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी हवालदाराने आपल्या पत्नीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी व पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या कथित धमकीचे कॉल रेकॉर्डही व्हायरल झाले आहे. सोमवारी (दि.९) रात्री साडेदहा ते मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आपला पती बेपत्ता झाल्याचे

प्रियंका यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठांशी बोलल्यानंतर त्यांच्या परवानगीने आपण भाष्य करू, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे. प्रियंका केमदारणे म्हणाल्या की, आपण सकाळी झोपेतून उठायच्या आधीपासून आपले पती घरी नाहीत. ते सकाळी झोपेतून उठल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी जातात. आठ वाजून गेल्यानंतर मी त्यांच्या सर्व मित्रांकडे चौकशी केली.

साडेआठ वाजता माझा मोबाइल बघितला. त्यावेळी आपल्या पतीने मोबाइलवर रेकॉर्डिंग व चिठ्ठी पाठवल्याचे दिसले. तीच चिठ्ठी नंतर घरातील ड्रॉवरमध्ये आढळली. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, विनोद रासकर व सूर्यवंशी यांची नावे या चिठ्ठीत होती. त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली, असे चिठ्ठीत लिहिले होते, अशी माहिती प्रियंका यांनी दिली.

Web Title: I will ruin your job and your life; Police inspector threatens; Constable goes missing