शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

"बायको येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही", नवरोबा चढला चक्क महावितरणच्या टॉवरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:46 AM

रुसुन माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून एका नवरोबांनी चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली

जुन्नर : रुसुन माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून एका नवरोबांनी चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली. आणि जोपर्यंत बायको परत येत नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली येणार नाही अशी अट घातली. नवरा बायकोच्या या भांडणात शेवटी जुन्नरपोलिसांच्या मध्यस्थीला यश आले आणि अखेरीस हे नवरोबा टॉवरवरून उतरते झाले. आणि बायकोसकट ,नातेवाईक परीवार व बघ्यांनी देखील सुटकेचा निश्वास  सोडला.

ही घटना जुन्नर लगतच्या पिंपळगाव सिद्धनाथ येथे घडली. तो संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी (ता. संगमनेर) येथील रहीवासी आहे. नवरोबा त्याच्या सासुरवाडीजवळच गोद्रे गावात असलेल्या या टॉवरवर हा युवक चढला होता.

बायको नांदायला येत नसल्याने या नवरोबा सासुरवाडी गोद्रे गावच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव सिद्धनाथ येथील, 150 फुट उंच हायहॉल्टेज टॉवरवर हातात दोरी घेऊन चढून बसला. त्याने नातलग, तसेच पोलिसांच्या डोक्याला चांगलाच ताप दिला. जवळपास एक - दीड तास तो टॉवरवर बसला होता. यानंतर बघ्यांची मोठी गर्दी केली होती. जुन्नर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला घटनास्थळी आणले व त्याची समजूत काढली. त्यानंतर पती टॉवरवरून खाली उतरला. 

 नवऱ्याने चाकण येथे कामानिमित्त झालेल्या ओळखीतून गोद्रे गावातील या मुलीसोबत लग्न लावून द्या असा तगादा लावला होता. अखेरीस सहा महिन्यांपूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून घरच्यांनी हे लग्न लावून दिले होते. याअगोदर देखील गोद्रे गावातील डोंगराच्या कड्यावर चढून या नवरोबाने धमक्या दिल्याचे समजते. तसेच या संदर्भात दोन तक्रारी जुन्नर पोलिसांकडे देण्यात आल्या होत्या. दरम्यान सदर विवाहितेला मारहाण होत असल्याने सासरी नांदायला जायला तयार नव्हती.

टॅग्स :Junnarजुन्नरmahavitaranमहावितरणmarriageलग्नPoliceपोलिस