पिंपरी : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांचे भव्य मंदिर निर्माण कार्य होत आहे. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला १०० एकर परिसरात बालाजी देवस्थान प्रमाणेच भव्य असे कॉरिडॉरचे काम व्हावे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी हजारो कोटी रुपयाचा निधी या कार्यासाठी देईन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीच्या तुकाराम महाराज बीजेच्या दिली होती, असे सांगत होते, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे दिली होती.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे आले होते. याविषयीची आठवण सांगताना अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील म्हणाले, तुकाराम बीजेच्या दिवशी दादा सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर आले होते व तीन तास थांबून मंदिराचे काम दादांनी बारकाईने पाहिले होते. दादांनी संपूर्ण मंदिराच्या व कॉरिडॉरच्या आराखडा बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली होती. घड्याळाच्या काट्या प्रमाणे वक्तशीरपणे अहोरात्र मायबाप जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे, स्पष्ट वक्ते व उमदे नेतृत्व मात्र आकस्मिकपणे वेळ चुकवून आज आपल्यातून हरपले. त्यामुळे अखिल वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्राचेच अतोनात हानी झाली आहे, संपूर्ण महाराष्ट्र आज निशब्द झाला आहे. .... माघ शुद्ध दशमी हा विश्ववंदनीय, जगद्गुरु संत तुकोबारायांचा अनुग्रह दिन, साक्षात्कार दिन. यानिमित्ताने गेली ७२ वर्ष श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव, गाथा पारायण सुरु आहे. यावर्षी हा सोहळा वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला साजरा होत आहे. परंतु आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान दादांच्या दुःखद अकस्मिक निधनाची बातमी येताच सर्वजण सुन्न झाले. नामस्मरणाचा हा यज्ञ असल्याने बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम रद्द करून इतर सांप्रदायिक कार्यक्रम सुरू होते. वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांनी महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दादांच्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर वरील भेटीच्या वेळीची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.
Web Summary : Ajit Pawar's sudden death deeply saddened the Warakari sect. He had pledged funds for the Bhandara Dongar temple, a commitment remembered during a memorial service. His contributions and dedication were highlighted.
Web Summary : अजित पवार के आकस्मिक निधन से वारकरी संप्रदाय में शोक की लहर है। भंडारा डोंगर मंदिर के लिए उन्होंने निधि देने का वादा किया था, जिसे श्रद्धांजलि सभा में याद किया गया। उनके योगदान और समर्पण को सराहा गया।