'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:54 IST2023-08-08T10:54:23+5:302023-08-08T10:54:33+5:30

राजकीय पक्षात काम करत असताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते

I see how to keep our party and our family in order Ajit Pawar statement | 'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

पुणे : आमचा परिवार आणि आमचा पक्ष कसा व्यवस्थित ठेवायचा याची काळजी करू नका. मी पाहतो आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जेजुरीला जाण्याआधी पुण्यात साखर संकुलमध्ये पवार काही वेळ थांबले होते. तिथे त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.

अमित शाह यांना जयंत पाटील भेटलेच नाहीत. भेटले असे सांगतात ते धादांत खोटे आहे. भेटले असते तर भेटले असेच सांगितले असते. ते सांगतात ते बरोबर आहे. ते आदल्या दिवशी पवार साहेबांबरोबर होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांच्याबरोबरच होते. ते इकडे आले, शाह यांना भेटले यात काहीही तथ्य नाही, असे पवार म्हणाले. तुम्ही प्रवेश केला त्यावेळी तुम्हीही आम्ही भेटलोच नाही असे सांगितले होते, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, मी खरोखरच भेटलो नव्हतो. पाठिंबा दिला त्यानंतरच मी भेट घेतली. त्याआधी भेट झालेलीच नव्हती.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे यावर बोलताना पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा असे सांगितले. राजकीय पक्षात काम करत असताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते. त्याप्रमाणे ते काम करत असतात, असे पवार म्हणाले. त्यानंतर ते लगेगच जेजुरीला जाण्यासाठी रवाना झाले.

Web Title: I see how to keep our party and our family in order Ajit Pawar statement